सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ यांचे संयुक्त सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेचा भाग म्हणून कोविडमुक्तीसाठी सहकार्य
Posted On:
11 MAY 2021 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मे 2021
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ या भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील दोन सार्वजनिक सेवा उपक्रमांनी त्यांच्या संयुक्त CSRम्हणजेच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेचा भाग म्हणून दुसऱ्या कोविड लाटेत कोविडबाधित रुग्ण व गरजूंच्या मदतीसाठी खालील कामे हाती घेतली आहेत.
धान्य वाटप
दिल्ली, मुंबई, बेंगळुरू अश्या शहरातील टाळेबंदीच्या दिवसांमध्ये स्थलांतरीत कामगारवर्ग, रोजंदार मजूर, वृदध, एकट्या व्यक्ती, आणि इतर गरजूंना अन्न पुरवण्यासाठी अन्न वाटपास मंजूरी मिळाली आहे. ह्या धान्यवाटपांतर्गत 15 दिवसांसाठी 39,000 अन्न पाकिटे दिली जातील. मुंबईत या कामाला 08.05.2021पासून सुरूवात झाली. तर बंगळुरू व दिल्लीत या कामाला 11.05.2021 पासून सुरूवात होत आहे. अन्न वाटपाचे हे काम राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ यांच्या मदतीने स्थानिक गैरसरकारी सेवाभावी संस्था पार पाडतील.
कोविड-19 रुग्णांवरील उपचारासाठी वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा
ऑक्सिजन सिलेंडर (39 ), एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि Bipap उपकरण या उपकरणांसहीत वैद्यकीय उपकरणे आचार्य श्री भिक्षू रुग्णालय आणि स्वामी दयानंद रुग्णालय या सरकारी रुग्णालयांना तसेच दिल्लीतल्या गैरसरकारी सेवाभावी संस्थांसाठी मंजूर झाली आहेत.
Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717675)
Visitor Counter : 309