रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे अंदाजे 3400 मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशला पोहोचवला

सध्या 26 टँकरमधून 417 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक सुरु

220 पेक्षा जास्त टँकर कार्यरत

52 पेक्षा जास्त फेऱ्या पूर्ण

महाराष्ट्रासाठी चौथी आणि नागपूरसाठी तिसरी ऑक्सिजन एक्सप्रेस मार्गस्थ

Posted On: 08 MAY 2021 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मे 2021


आतापर्यंत महाराष्ट्रात 230 मेट्रिक टन, उत्तर प्रदेशात 968 मेट्रिक टन, मध्य प्रदेशात 249 मेट्रिक टन, हरियाणामध्ये  355 मे.टन, तेलंगणामध्ये 123 मेट्रिक टन, राजस्थानमध्ये 40 मे.टन आणि दिल्लीत 1427 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा  झाला आहे.

सर्व अडथळ्यांवर विजय मिळवून आणि नवीन उपाय शोधून भारतीय रेल्वेने द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यात पोचवून मदतीचा ओघ कायम ठेवला आहे. आतापर्यंत, भारतीय रेल्वेने देशातील विविध राज्यांत 220 हून अधिक टँकरद्वारे जवळपास 3400 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन वितरित केला आहे.

आतापर्यंत 54 ऑक्सिजन एक्सप्रेसनी त्यांचा प्रवास पूर्ण केला आहे.

मागणी करणाऱ्या राज्यांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.

ही बातमी तयार होण्याच्या वेळेपर्यंत महाराष्ट्रात 230 मेट्रिक टन, उत्तर प्रदेशात 968 मेट्रिक टन, मध्यप्रदेशात 249 मेट्रिक टन, हरियाणामध्ये 355 मेट्रिक टन, तेलंगणामध्ये 123 मेट्रिक टन, राजस्थानमध्ये 40 मेट्रिक टन आणि दिल्लीत 1427 मेट्रिक टन पुरवठा  झाला आहे.

सध्या द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनच्या 417 मे.टनसह 26 टँकर मार्गक्रमण करत आहेत जे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथे येण्याची शक्यता आहे. ऑक्सिजनची वाहतूक  करणे हा एक अतिशय गतिमान उपक्रम असल्याने टँकर विषयक आकडेवारी सातत्याने अद्ययावत होत राहते. आणखी काही ऑक्सिजन एक्सप्रेस रात्री उशिरा मार्गस्थ होणे अपेक्षित आहे.

 

* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1717053) Visitor Counter : 18