रसायन आणि खते मंत्रालय
21 एप्रिल ते 16 मे 2021 या कालावधीत करण्यात येत असलेल्या रेमडेसीवीर औषधाच्या पुरवठ्याचे कंपनी-निहाय नियोजन
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2021 10:01AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 8 मे 2021
देशातील 21 एप्रिल ते 16 मे 2021 या कालावधीत करण्यात येत असलेल्या रेमडेसीवीर औषधाच्या पुरवठ्याचे कंपनी-निहाय नियोजन सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कळविण्यात आले आहे. औषध वितरक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हे नियोजन करण्यात आले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या पुरवठा नियोजनानुसार रेमडेसीवीर औषधाचा पुरवठा योग्य वेळी केला जात आहे, याची सुनिश्चिती करून घेण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना काल करण्यात आलेल्या रेमडेसीवीर औषधाच्या पुरवठ्याच्या प्रक्रियेचा विस्तार करीत हे नियोजन करण्यात आले आहे.
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1716744
रेमडेसीवीर औषधाच्या पुरवठ्याचे कंपनी निहाय नियोजन

***
Sonal T/Sanjana C/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1716996)
आगंतुक पटल : 263