संरक्षण मंत्रालय

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात भारतीय सैन्यदलांची कृतीशीलता

Posted On: 07 MAY 2021 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2021

 

भारतात सध्या कोविड महामारीची दुसरी लाट आली असून संपूर्ण देश या संकटाचा सामना करत आहे. आणि जेव्हा जेव्हा देश संकटात असतो, त्यावेळी भारताची सैन्यदले देशाच्या मदतीला तत्परतेने धावून येतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. गेल्या काही आठवड्यात, सैन्यदले या महामारीविरुद्ध रणशिंग फुंकत, या लढ्यात उतरली असून केंद्रीय राज्य सरकारच्या विविध संस्थांना आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहेत.

विविध ठिकाणी आरोग्य यंत्रणांवरचा ताण कमी करण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी पुरवण्यापासून ते जगाच्या कानाकोपऱ्यातून अत्यावश्यक सामान आणण्यासाठी सैन्यदलाची विमाने आकाशात झेपावली आहेत. त्याचवेळी नादुरुस्त स्थितीत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटची दुरुस्ती तसेच देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरुच्या बंदरांवर नौदलाची जहाजे विविध देशातून कोविड विषयक मदत घेऊन पोहचत आहेत. सगळ्या आघाड्यांवर  भारताचे हे सूर जवान तत्परनेणे कार्यरत झाले आहेत. डीआरडीओ ने नवी दिल्ली, पाटणा, अहमदाबाद, लखनौ आणि इतर ठिकाणी विक्रमी वेळेत रुग्णालये उभारली असून वाराणसी येथे एक रुग्णालय उभारले जाणार आहेत. या सर्व रुग्णालयांचे व्यवस्थापन लष्करी दलांचेच 500 डॉक्टर्स आणि परिचारिका बघत आहेत. युद्धभूमीवर प्रथमोपचार देण्यासाठी प्रशिक्षित नर्सिंग सहकारी, सैनिक, खलाशी, हवाई दल कर्मचारी असे सर्व ज्यांना जुजबी वैद्यकीय ज्ञान आणि प्रशिक्षण दिलेले असते, त्यांचीही अनेक ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

आणि ही सर्व वैद्याकीय मदत करतांना, देशाच्या संरक्षणाची जबाबदारीही तेवढ्याच चोखपणे सांभाळली जात आहे. जल, थल, नभ अशा तिन्ही सीमांचे रक्षण करण्यासाठी सेना समर्थ आहे. सैन्यदलातील 98 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ही दले देशभर सरकारी यंत्रणांशी समन्वय साधत, वैद्यकीय प्रयत्नांचा जास्तीत जास्त उपयोग होय शकेल यासाठी कार्यरत आहेत.मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कमी क्षमतेत काम करणाऱ्या लष्करी रुग्णालयांमध्ये सुविधा अद्ययावत करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.

देशांतर्गत स्रोतांकडून  आणि परदेशातून ऑक्सिजन निर्मिती यंत्रे, वैद्यकीय सामान, प्रयोगशाळेतील साधने आणि आरोग्य कर्मचारी यांना कोविड प्रादुर्भावाचा हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी लष्करी वाहने, नौदलाची जहाजे आणि हवाई दलाची विमाने रोज प्रवासाच्या अनेक फेऱ्या करीत आहेत.

लष्करी रुग्णालयांच्या मर्यादित क्षमतांमुळे, आपल्या निवृत्त सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सुविधा पुरविणे हा सन 2003 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ECHS  अर्थात माजी कर्मचारी अंशदान आरोग्य योजनेचा उद्देश आहे. मात्र, या योजनेत सहभागी नागरी रुग्णालये अतिशय अडचणीत असल्यामुळे अनेक माजी सैनिकांना तिथे दाखल करून घेण्यास नकार दिला जातो. आणि त्यामुळे आधीच रुग्णसेवेचा खूप दबाव सहन करणाऱ्या लष्करी रुग्णालयांवरील ताण अधिकच वाढतो. जरी आताच्या परिस्थितीत, जीव वाचविण्याचा प्रश्न येतो तेव्हा कोणालाच कोणापेक्षा अधिक प्राधान्य देण्याची परिस्थिती नाही तरीही जेव्हा आपल्या माजी सैनिकांच्या उपचाराचा प्रश्न येतो तेव्हा साधनांच्या उपलब्धतेवरील मर्यादा हा एकच अडथळा आहे. सध्याच्या परीक्षेच्या घडीला ECHS योजनेत सहभागी नागरी रुग्णालयांनी माजी सैनिकांना उपचार नाकारण्याने या उपक्रमाच्या कार्यक्षमतेबाबत अनेक समुचित प्रश्न निर्माण होतात. याबाबतीत येत्या काळात अधिक चांगले आणि उपयुक्त पर्याय शोधण्यासाठी सशस्त्र दलांना या विषयामध्ये बारकाईने लक्ष घालावे लागेल.

राष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांच्या दिशेने शक्य असलेली प्रत्येक गोष्ट करण्यासाठी सशस्त्र दले कटिबद्ध असताना, राष्ट्रीय सुरक्षा आणि कार्यान्वयनाच्या तयारीत त्यांनी कुठलीही तडजोड केलेली नाही.

MC/RA/SC/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716952) Visitor Counter : 182