संरक्षण मंत्रालय
ई-संजीवनीच्या बाह्यरूग्ण विभागात -संरक्षण क्षेत्रातील माजी डॉक्टरांचे योगदान
प्रविष्टि तिथि:
07 MAY 2021 7:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2021
संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि व्हाईस ॲडमिरल रजत दत्ता, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम,पीएचएस,महासंचालक,सशस्त्र सेनादल वैद्यकीयसेवा यांनी देशासमोर उभ्या राहिलेल्या आवाहनाला उत्तर देण्यासाठी पुढे आलेल्या लष्करी वैद्यकीय सेवानिवृत्तांना संबोधित केले. हे सर्व संरक्षणदलातील माजी वैद्यकीय तज्ञ आता भारतातील सर्व नागरिकांना “ ई-संजीवनी ओपीडी " वरून ऑनलाईन सल्ला सेवा देतील.
ई-संजीवनी ओपीडी, हा भारत सरकारचा असा वैशिष्ट्यपूर्ण टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म आहे, जो केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असून, मोहाली येथील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ एडव्हान्स कंप्यूटिंग (सी-डॅक ) आणि भारत सरकारच्या यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केला असून ,तो अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. या मंचाद्वारे कोणत्याही भारतीय नागरिकाला विनामूल्य वैद्यकीय सल्ला प्रदान केला जातो. तथापि, कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ,डॉक्टरांची अधिक आवश्यकता भासत आहे, त्यामुळे अधिकाधिक डॉक्टर कोविड रुग्णांच्या विभागात कार्यरत झाले आहेत.याच कारणास्तव संरक्षण दलातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सहाय्य करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
एकात्मिक संरक्षण कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयातील वैद्यकीय शाखा, सेवेतील अथवा सेवानिवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांना टेलिमेडिसिन सेवा प्रदान करीत आहे आणि त्यांनी त्यासाठी आरोग्य मंत्रालय आणि एनआयसी यांच्याशी समन्वय साधला असून नागरी रुग्णांसाठी ही संरक्षण दलातील माजी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ओपीडी सुरू केली आहे. एकात्मिक वैद्यकीय संरक्षण कर्मचारी उपप्रमुखांनी सर्व सेवानिवृत्त एएफएमएस डॉक्टरांना या व्यासपीठावर सामील व्हावे आणि देश कठीण परिस्थितीतून जात असताना या संकटाच्या वेळी भारतातील नागरिकांना वैद्यकीय सल्ला देण्याचे मोलाचे कार्य करण्याचे आवाहन केले आहे.
संरक्षण दलातील सेवानिवृत्त डॉक्टरांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि लवकरच आणखी काहीजण यात सामील होतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर स्वतंत्र नेशनवाइड एक्स डिफेन्स डॉक्टर ओपीडीची संकल्पना राबविली जाईल. या डाँक्टरांचा अफाट अनुभव आणि कौशल्य मोठ्या प्रमाणावर रुग्णांना आपापल्या घरांतूनच सल्ला घेण्यास आणि संकटातून बाहेर पडण्यास मदत करेल.
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1716887)
आगंतुक पटल : 240