रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेत 100 व्या 12000 अश्वशक्तीच्या वॅग 12 बी रेल्वे इंजिनाचा समावेश
प्रविष्टि तिथि:
06 MAY 2021 7:28PM by PIB Mumbai
भारतीय रेल्वेच्या ताफ्यात 100 वे 12000 एचपी डब्ल्यूएजी 12 बी रेल्वे इंजिन समाविष्ट करण्यात आले असून भारतीय रेल्वेसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. ही देशातील सर्वात शक्तिशाली ‘मेड-इन-इंडिया’ इलेक्ट्रिक इंजिन्स आहेत. या इंजिनाचे नाव डब्ल्यूएजी 12 बी असे आहे जे 60100 क्रमांकाचे आहे. हे इंजिन मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडने (एमईएलपीएल) तयार केले आहे.

ही रेल्वे इंजिन्स आयजीबीटी शैलीवर आधारित 3 फेज ड्राइव्ह आणि 12000 अश्वशक्ती इलेक्ट्रिक इंजिन दर्जाची आहेत. ही उच्च अश्व शक्ती असलेली इंजिन्स सरासरी वेग आणि मालवाहतूक करणार्या गाड्यांची भार क्षमता सुधारून गर्दी असलेल्या रेल्वेमार्गावरील ताण हलका करण्यास मदत करतील .
'मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेली ही उत्कृष्ट इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन्स देशातील मालवाहतूक चळवळीत क्रांती घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. जलद, अधिक सुरक्षित आणि जड मालवाहतुकीच्या गाड्यांना देशभर जाण्याची परवानगी देताना भार क्षमता सुधारल्याने गर्दी असलेल्या रेल्वेमार्गावरील ताण हलका होण्यास मदत होईल. आतापर्यंत, ही ई-इंजिन्स रेल्वेच्या सर्व विभागात आहेत आणि चांगली कामगिरी करत आहेत.
***
M.Chopade/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1716590)
आगंतुक पटल : 341