आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक समुदायाकडून कोविड-19 विषयी मिळणारी मदत केंद्र सरकारकडून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रभावीपणे वितरीत
1764 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, 1760 ऑक्सिजन सिलेंडर्स, सात ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 450 व्हेंटीलेटर्स, 1.35 लाखांपेक्षा अधिक रेमडेसीवीरच्या कुप्यांचे आतापर्यंत वितरण
Posted On:
05 MAY 2021 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2021
गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोविड-19 रूग्णांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ होतांना दिसते आहे. रुग्णसंख्या तसेच मृत्यूसंख्याही वाढल्यामुळे अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य यंत्रणा आणि पायाभूत सुविधांवर ताण पडला आहे. केंद्र सरकार कोविड विरुद्धच्या या देशव्यापी लढाईचे नेतृत्व करत असून, राजे आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधत आहे. या संकटकाळात राज्यांना सर्व सहकार्य आणि आवश्यक तो पाठींबा देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
‘वसुधैव कुटुंबकम’ च्या तत्वाचे पालन करत संपूर्ण जागतिक समुदाय अशावेळी भारताच्या मदतीसाठी पुढे झाला असून विविध स्तरातून भारताकडे मदतीचा ओघ येतो आहे.
केंद्र सरकारला 27 एप्रिल 2021 पासून परदेशांतून कोविड विषयक साहित्य आणि उपकरणांची मदत मिळते आहे. यात, इंग्लंड, आयर्लंड, रोमानिया, रशिया, युएई, अमेरिका, तैवान, कुवैत, फ्रांस, थायलंड, जर्मनी, बेल्जियम, इटली, उझबेकिस्तान अशा देशांचा समावेश आहे.
27 एप्रिलपासून 4 मे 2021 पर्यंत सुपूर्त केलेली मदत अशी- 1764 ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, 1760 ऑक्सिजन सिलेंडर्स, सात ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 450 व्हेंटीलेटर्स, 1.35 लाखांपेक्षा अधिक रेमडेसीवीर कुप्या, 1.20 लाख फावीपिरावीरच्या गोळ्या
चार मे पर्यंत मिळालेली महत्वाची साधने आणि उपकरणे पुढीलप्रमाणे :
- ऑक्सिजन काँसंट्रेटर्स (1274),
- व्हेंटीलेटर्स (101),
- ऑक्सिजन सिलेंडर्स (587),
- ऑक्सिजन निर्मिती प्लांट (2),
- रेमडेसीवीर (1,53,708),
- मेडिकल कॅबिनेट (33), आणि इतर
चार मे पर्यंत मिळालेले सर्व साहित्य आणि उपकरणे राज्यांना वितरीत करण्यात आली असून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716377)
Visitor Counter : 255