श्रम आणि रोजगार मंत्रालय

सामाजिक सुरक्षा संहिता -2020 च्या कलम 142 ची अधिसूचना जारी

Posted On: 05 MAY 2021 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2021

 

सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मधील कलम 142 विषयीची अधिसूचना केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने जारी केली असून त्यात आधार क्रमांकाचे उपयोजन  समाविष्ट करण्यात आले  आहे. या अधिसूचनेमुळे श्रम आणि रोजगार मंत्रालयाला विविध सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती संकलित करतांना आधार ची माहिती देखील गोळा करता येईल.

असंघटीत क्षेत्रातील कामगार/मजूरांच्या माहितीचे संकलन ही नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर (राष्ट्रीय माहिती केंद्र) ची पुढची पायरी आहे. पोर्टलचा उद्देश, स्थलांतरित मजूरांसह असंघटीत कामगारांची माहिती संकलित करुन सरकारच्या विविध योजनांचा लाभ या मजूरांपर्यंत पोचवणे हा आहे. आंतर-राज्यीय स्थलांतरित मजूर देखील केवळ आधार क्रमांकाच्या मदतीने या पोर्टलवर नोंदणी करु शकतात.

सामाजिक सुरक्षा संहितेच्या या कलमाची अधिसूचना केवळ असंघटीत मजूरांची माहिती संकलित करण्यासाठी जारी करण्यात आली आहे. आधार क्रमांक नसला तरी कोणत्याही कामगाराला लाभांपासून वंचित ठेवले जाणार नाही,असे केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी स्पष्ट केले आहे.


* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1716286) Visitor Counter : 463