परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी याबाबत भारत आणि युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2021 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत भारत आणि युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड यांच्यात स्थलांतर आणि लोकांची ये-जा संदर्भातली भागीदारी याविषयीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याला मंजुरी देण्यात आली.
उद्दिष्टे :
विद्यार्थी, संशोधक आणि कुशल व्यावसायिकांसाठी व्हिसा जारी करण्याची प्रक्रिया उदार करत यांच्या ये-जा करण्याला प्रोत्साहन देणे त्याचबरोबर अनियमित स्थलांतर आणि मानवी तस्करीशी संबंधित मुद्य्यांवर उभय बाजूनी सहकार्य दृढ करण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
भारतीय विद्यार्थी, शिक्षणतज्ञ, संशोधक, व्यावसायिक आणि आर्थिक कारणांसाठी स्थलांतरित तसेच दोन्ही देशांच्या आर्थिक विकासात, जात, धर्म किंवा लिंग लक्षात न घेता विविध प्रकल्पात योगदान देऊ इच्छिणाऱ्या सर्वाना या सामंजस्य कराराचा लाभ होणार आहे. प्रतिभेचा मुक्त ओघ सुलभ केल्याने या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशातल्या नवोन्मेश परीसंस्थेला बळकटी मिळणार आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय,या सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, संयुक्त कार्यकारी गट यंत्रणेद्वारे बारकाईने देखरेख ठेवणार आहे.
***
JPS/NC/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1716166)
आगंतुक पटल : 228