रेल्वे मंत्रालय

राज्य सरकारच्या मागणीनुसार रेल्वेने अजनी येथे 11 अलगीकरण कोचेस तैनात केले

Posted On: 04 MAY 2021 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मे 2021

 

कोविड विरुद्ध अविरत लढाईत  रेल्वे मंत्रालय धडक  कारवाईद्वारे मनुष्यबळ आणि सामुग्री  एकत्रित करून संबंधित राज्यांद्वारे मागणीच्या ठिकाणी अलगीकरण कोचेस तैनात करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेत आहे. अलगीकरण कक्ष म्हणून वापरण्यासाठी रेल्वेने सुमारे 64000  बेड असलेले अंदाजे 4000 आयसोलेशन कोचेस  तैनात केले आहेत.

हे आयसोलेशन कोचेस सहजपणे हलवले जाऊ शकतात आणि भारतीय रेल्वेच्या मार्गावर  मागणीच्या ठिकाणी तैनात केले जाऊ शकतात. रेल्वेकडून संबंधित जिल्हा प्रशासनासमवेत  सामायिक जबाबदारीबाबत करार  आणि जलद  कृती योजना त्वरित आखल्या जात आहेत.

नंदुरबार (महाराष्ट्र) येथे गेल्या काही दिवसांत 6  नवीन रुग्ण दाखल झाले असून  असून पाच  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  31 कोविड रूग्ण सध्या या सुविधेत अलगीकरणात आहेत. राज्य आरोग्य प्रशासनाद्वारे आतापर्यंत 95  रुग्णांना प्रवेश देण्यात आला असून  60 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. रेल्वेने अजनी इनलँड कंटेनर डेपो  येथे 11 कोविड केअर कोच ( वैद्यकीय कर्मचारी आणि पुरवठ्यासाठी खास एक कोच ) तैनात केले आहेत आणि नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित केले आहेत.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716032) Visitor Counter : 139