आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दिल्लीतील कोविड-19 रुग्णांसाठी प्राणवायू पुरवठा
पीएमकेअर्स च्या निधीतून नवी दिल्लीत एम्स आणि आरएमएल रुग्णालय या दोन ठिकाणी वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू
Posted On:
04 MAY 2021 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2021
दैनंदिन कोविड रुग्णसंख्येत दिसणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वाधिक वाढीच्या पार्श्वभूमीवर प्राणवायूचा सलग पुरवठा, प्राणवायू संलग्न खाटा व जीवरक्षक प्रणालीयुक्त खाटा यांची संख्या कित्येक पटीने वाढवण्यात येत आहे. नवी दिल्लीतील सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर स्वरूपाच्या कोविड रुग्णांवरील परिणामकारक योग्य वैद्यकीय उपचारासाठी प्राणवायूच्या सलग पुरवठ्याच्या आवश्यकतेचा आढावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी 23 एप्रिल 2021 रोजी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला.
संरक्षण संशोधन व विकास संस्था दिल्लीतील वेगवेगळ्या रुग्णालयात पाच PSA प्राणवायू प्रकल्प उभारेल असा निर्णय घेण्यात आला. एम्स ट्रॉमा सेंटर, डॉ राममनोहर लोहिया रुग्णालय (RML), सफदरजंग रुग्णालय, लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय, आणि हरयाणातील झज्जर येथील एम्स येथे हे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे ठरले. हे प्रकल्प PM-CARES च्या निधीतून उभारण्यात येणार होते. कोविड रुग्णांची अभूतपूर्व वाढती संख्या आणि परिणामी प्राणवायूची जाणवणारी कमतरता या बाबींवर तोडगा म्हणून देशभरात 500 वैद्यकीय प्राणवायू प्रकल्पांच्या उभारणीसाठी PM-CARES मधून निधी देण्यात आला. हे प्रकल्प 3 महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे.
यापैकी एम्स आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयात वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले असून ते आज रात्री पूर्ण होण्याची शक्यता आहे.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716022)
Visitor Counter : 306