रेल्वे मंत्रालय
दिल्लीला 120 एमटी द्रवरूप प्राणवायूची दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस प्राप्त झाली
Posted On:
02 MAY 2021 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2021
भारतीय रेल्वेने पहिली ऑक्सिजनचे वहन करणारी एक्सप्रेस सुरू केल्यापासून आतापर्यंत 1094 मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायूचे वितरण केले
भारतीय रेल्वेने, देशभरातील जनतेच्या वैद्यकीय उपचारांसाठी, देशातील विविध राज्यांत 74 टँकर्सरद्वारे 1094 मेट्रिक टन द्रवरूप प्राणवायूच्या एक्स्प्रेस गाड्या मार्गस्थ करत, विविध राज्यांपर्यंत द्रवरूप प्राणवायू (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, एलएमओ) आतापर्यंत रवाना केला आहे. 19 ऑक्सिजन एक्सप्रेसेसने आपला प्रवास या आधी पूर्ण केला आहे आणि आणखी दोन एक्सप्रेस,(अंदाजे) चार टँकरमध्ये 61.46 मे.टन प्राणवायू भरून घेऊन जात आहेत.
विनंती करणाऱ्या राज्यांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त एलएमओ पोहोचवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.
दिल्लीला आज 120 मेट्रिक टन एलएमओचे वहन करणारी दुसरी ऑक्सिजन एक्सप्रेस पोहोचली तर 30.86 मेट्रिक टन एलएमओचे वहन करणारी, तिसरी ऑक्सिजन एक्सप्रेस अंगुलहून दिल्लीकडे रवाना झाली आहे.
तेलंगानासाठी 63.6 मेट्रिक टन एलएमओ घेऊन जाणारी पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस अंगुलहून पोहोचली आहे.हरियाणा आणि दिल्ली करीता 61.66 मेट्रिक टन एलएमओ घेऊन जाणाऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेस मार्गस्थ झाल्या आहेत.
आतापर्यंत भारतीय रेल्वेने 1094 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) महाराष्ट्र (174 मे.टन), उत्तर प्रदेश (430.51 मे.टन), मध्य प्रदेश (156.96 मे.टन), दिल्ली ( 190 मे. टन), हरियाणा (79 मे. टन) तेलंगाना (63.6 मे.टन) यांना आत्तापर्यंत वितरीत केला आहे.
* * *
M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715553)
Visitor Counter : 257