पंतप्रधान कार्यालय
देशातील नायट्रोजन निर्मिती प्रकल्पांचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांमध्ये रूपांतर करणार
देशातील 14 उद्योगांमध्ये रुपांतरणाचे काम सुरू; आणखी प्रकल्प निवडण्याची प्रक्रिया सुरु
आणखी 37 नायट्रोजन निर्मिती प्रकल्पांचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांमध्ये रुपांतरण करण्यासाठी आणखी 37 प्रकल्प निश्चित
ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी केलेल्या अन्य उपाययोजनांना हे उपाय साहाय्यभूत ठरतील
Posted On:
02 MAY 2021 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2021
कोविड 19 महामारीच्या परिस्थितीत वैद्यकीय ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मितीसाठी विद्यमान नायट्रोजन प्रकल्पांचे रूपांतर करण्याच्या व्यवहार्यतेची चाचपणी केली. विद्यमान नायट्रोजन प्रकल्प ऑक्सिजन उत्पादनासाठी वापरता येतील अशा अनेक संभाव्य उद्योगांची निवड करण्यात आली आहे.
ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी विद्यमान प्रेशर स्विंग ऍबसॉरप्शन (पीएसए) नायट्रोजन प्रकल्पांचे रूपांतर करण्याच्या प्रक्रियेवर यावेळी चर्चा झाली. नायट्रोजन प्रकल्पांमध्ये कार्बन मॉलेक्युलर सिव्ह (CMS) वापरले जाते तर ऑक्सिजन तयार करण्यासाठी झीओलाइट मॉलेक्युलर सिव्ह (ZMS) आवश्यक असते. म्हणूनच, सीएमएसच्या ऐवजी झेडएमएस वापरून आणि ऑक्सिजन अॅनालायझर, कंट्रोल पॅनेल सिस्टम, फ्लो व्हॉल्व्ह इत्यादी सारखे काही बदल करून सध्याच्या नायट्रोजन प्रकल्पांमध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी बदल करता येतील.
उद्योगांबरोबर चर्चा केल्यावर आतापर्यंत 14 उद्योगांची निवड करण्यात आली आहे, ज्यात प्रकल्पांचे परिवर्तन प्रगतीपथावर आहे. आणखी 37 नायट्रोजन प्रकल्प देखील उद्योग संघटनांच्या मदतीने निवडण्यात आले आहेत.
ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी सुधारित नायट्रोजन प्रकल्प जवळच्या रूग्णालयात हलवता येऊ शकतो किंवा जर प्रकल्प हलवणे व्यवहार्य नसेल तर ते ऑक्सिजनच्या ऑन-साईट उत्पादनासाठी वापरले जाऊ शकतात, जे नंतर सिलेंडर/ विशिष्ट उपकरणाच्या माध्यमातून रुग्णालयात पाठवले जाऊ शकते.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, रस्ते वाहतूक व महामार्ग सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715511)
Visitor Counter : 340
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam