विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड -19 संक्रमण वाढीविषयी सूत्र (SUTRA) या प्रारुपावर कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांचे निवेदन

Posted On: 02 MAY 2021 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2021

 

कोविड -19 च्या  प्रक्षेपण मार्गाच्या आलेखाच्या सूत्र (SUTRA) या प्रारुपावर कार्य करणारे आम्ही शास्त्रज्ञ, आमच्या गणिताच्या प्रारुपाच्या भविष्यातील शक्यतांविषयी संबंधित काही तथ्यांबाबत  स्पष्टपणे सांगू इच्छित आहोत, कारण यापैकी काही चुकीच्या बाबी तर काहींचा उल्लेख चुकीच्या पध्दतीने करण्यात आला  आहे. काही माध्यमांमधील अलीकडील अहवालात असे संकेत दिले जात आहेत, की सुत्र (SUTRA) प्रारुपावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये येऊ शकणाऱ्या  दुसर्‍या लाटेबद्दल सावधगिरी बाळगावी अशी सूचना केली होती परंतु त्याकडे लक्ष दिले गेले नाही. हे पूर्णत: चुकीचे आहे.

या राष्ट्रीय महामारीविरोधात लढण्यासाठी सरकारच्या वतीने समन्वय साधणाऱ्या  एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने आमची संगणकीय माहिती जाणून  घेण्यासाठी 2 एप्रिल रोजी एक बैठक बोलावली होती. त्यावेळी आम्ही असे  सूचित केले होते, की ‘सूत्र’ प्रारुपाने एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात दुसर्‍या लाटेने उच्चतम पातळी गाठण्याची आणि बहुधा रोज 1 लाख रुग्णसंख्येची दैनंदिन नोंद होण्याची शक्यता आहे.

प्रारूपाने वर्तविलेल्या  शक्यता  खाली दिलेल्या कारणांमुळे चुकीच्या ठरल्या  होत्या.

आम्ही विषाणूच्या प्रसाराचा अंदाज लावण्यासाठी गणितीय प्रारुपानुसार कार्य  करत आहोत. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे, की जोपर्यंत विषाणूची गतिशीलता आणि त्याचा संक्रमण कालावधीत  मोठ्या प्रमाणात बदलत नाही, तोपर्यंतच गणिताचे प्रारुप केवळ काही निश्चिततेसह भविष्यातील शक्यता सांगू  शकते.  गैर-औषधीय हस्तक्षेप यासारख्या  विविध धोरणात्मक निर्णयाशी संबंधित वैकल्पिक परिस्थितीचा अंदाज लावण्यासाठी ही यंत्रणा गणितीय प्रारुपे प्रदान करू शकते.

कोविड -19 च्या बाबतीत, हे स्पष्ट आहे की विषाणूचे स्वरूप खूप वेगाने बदलत आहे. या संदर्भाने, कोविड -19 बद्दलच्या कोणत्याही भविष्यातील शक्यता सतत बदलत जाणे शक्य आहे, कधीकधी, जवळजवळ दररोजसुद्धा बदलत जाणे शक्य आहे.

आम्ही सरकारसमवेत जवळून काम करत आहोत आणि आमच्या माहितीला  नेहमीच सकारात्मक सहकार्य मिळाले आहे. आम्ही दुसर्‍या लाटेच्या नेमक्या स्वरुपाचा अंदाज घेऊ शकत नसलो तरी, भविष्यात अधिक चांगल्याप्रकारे अंदाज लावण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू.

मनिंदर अग्रवाल, प्राध्यापक, आयआयटी कानपूर

माधुरी कानिटकर, उपप्रमुख, इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफ

एम. विद्यासागर, प्राध्यापक, आयआयटी हैदराबाद


* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715509) Visitor Counter : 252