भारतीय निवडणूक आयोग
कोविड मार्गदर्शक तत्वांचे पालन करत मतदान झालेली राज्ये/केंद्रशासित प्रदेश मतमोजणीसाठी सज्ज
Posted On:
01 MAY 2021 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2021
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज आभासी बैठकीच्या माध्यमातून आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत मतमोजणीच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. चंद्रा यांनी आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन केलेच पाहिजे असे निर्देश दिले. सर्व मतमोजणी सभागृहांनी पूर्णपणे कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी निर्देश दिले. महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीत संबंधित राज्यात मतदान प्रक्रीया यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
मतदान झालेल्या पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेश आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आणि पोटनिवडणूक झालेल्या लोकसभा मतदारसंघ/विधानसभा मतरदारसंघामध्ये मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. निवडणूक आयोगाने पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 822 विधानसभा मतदारसंघ आणि पोटनिवडणुक झालेल्या 4 लोकसभा मतदारसंघ तसेच तेरा राज्यातील 13 विधानसभा मतदारसंघामध्ये सुरळीत व सुरक्षित मतमोजणीसाठी चोख विस्तृत व्यवस्था केली आहे.
S.Tupe/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1715441)
Visitor Counter : 245