माहिती आणि प्रसारण मंत्रालय

भारतीय माहिती सेवेतील अधिकारी पुष्पवंत शर्मा यांचे निधन

Posted On: 30 APR 2021 10:31PM by PIB Mumbai

 

भारतीय माहिती सेवेतील आणखी एक ज्येष्ठ अधिकारी श्री.पुष्पवंत शर्मा यांचे आज कोविड संसर्गामुळे निधन झाले. नोएडा येथील जेपी रुग्णालयात त्यांनी या आजाराशी दीर्घकाळ झुंज दिल्यावर आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर कोविड-19 आणि अस्थमा यावर उपचार सुरु होते.

उपसंचालक असणारे 58 वर्षे वयाचे पुष्पवंत शर्मा, रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या कार्यालयात सहाय्यक प्रेस रजिस्ट्रार या पदावर कार्यरत होते. भारतीय माहिती सेवेतील 34 वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या उज्ज्वल कारकीर्दीत त्यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध माध्यम एककांमध्ये काम केले. यामध्ये पत्र सूचना कार्यालय (मुझफ्फरपूर आणि पाटणा), डीएफपी (मुझफ्फरपूर), ऑल इंडिया रेडिओ वृत्तविभाग (रांची), डी डी न्यूज (पाटणा आणि नवी दिल्ली) यांचाही समावेश आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पवंत शर्मा यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केली आहे. लोकसेवेतील समर्पण आणि उच्च व्यावसायिक गुणवत्ता असणारे अधिकारी म्हणून पुष्पवंत शर्मा यांचे नाव स्मरणात राहणार आहे.

या महिन्यात यापूर्वी आणखी तीन ज्येष्ठ आय आय एस अधिकारी- नरेंद्र कौशल (ए डी जी- पीआयबी), मणिकांत ठाकूर (माध्यम प्रमुख, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय) आणि संजय कुमार (उपसंचालक, पीआयबी) यांचे कोरोना संसर्गाशी संबंधित गुंतागुंतीमुळे देहावसान झाले.

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715229) Visitor Counter : 134