रेल्वे मंत्रालय

उद्योगपूरक वातावरणाला चालना देत, रेल्वेने मालवाहतुकीसाठीच्या ऑनलाईन पेमेंट व्यवस्थेबद्दल जारी केल्या मार्गदर्शक सूचना


मार्गदर्शक सूचना एक जून 2021 पासून होणार लागू

प्रविष्टि तिथि: 30 APR 2021 8:33PM by PIB Mumbai

 

भारताने माहिती आणि दूरसंवाद क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधत, बहुतांश क्षेत्रात, वेबच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट व्यवस्था प्रत्यक्षात लागू करण्यात यश मिळवले आहे. त्याच मालिकेत, आता रेल्वेच्या मालवाहतुकीचे सर्व शुल्क ऑनलाईन भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून, यात अत्यंत सुलभ, सोप्या, जलद आणि पारदर्शक पद्धतीने मालवाहतूक शुल्क आणि इतर किरकोळ पूरक शुल्क देखील ऑनलाईन स्वरूपात भरता येणार आहे. वेबच्या माध्यमातून हे शुल्क भरणे शक्य होणार आहे.

याच दिशेने रेल्वे मंत्रालयाने आज, म्हणजे 30 एप्रिल रोजी मालवाहतुकीच्या ऑनलाईन शुल्कव्यवस्थेविषयीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मालवाहतूक विषयक फ्रेट बिझनेस डेव्हलपमेंट पोर्टलच्या माध्यमातून एसबीआय पेमेंट गेटवे द्वारे ही व्यवस्था ग्राहकांना उपलब्ध असेल. मालवाहतुकीचे मूळ शुल्क आणि त्याशिवाय इतर पूरक भाडे, जसे की प्रिमीयम वाहतूक शुल्क, वैगन नोंदणी शुल्क, विलंबशुल्क, धक्का वापरण्याचे शुल्क, सायडिंग शुल्क, शंटिंग शुल्क, पुनर्नोंदणी शुल्क, वाहतूक बदल शुल्क इत्यादी शुल्क देखील ऑनलाईन स्वरूपात 24 तास भरता येणार आहेत. या मार्गदर्शक सूचना 1 मे 2021 पासून लागू होतील.

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा :

 

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1715186) आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu , Kannada