उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांना श्रद्धांजली वाहिली
प्रविष्टि तिथि:
30 APR 2021 7:23PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी यांना श्रद्धांजली वाहिली. सोराबजी यांचे आज सकाळी कोविडमुळे निधन झाले.
कायद्याचे ज्ञान असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून सोराबजी यांचे वर्णन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, कायदा आणि न्यायशास्त्राच्या सर्व बाबींची माहिती असणारे ते जणू विश्वकोषच होते. मानवी हक्कांचे ते पुरस्कर्ते होते आणि त्यांनी आपल्या कार्याद्वारे भारताला आंतरराष्ट्रीय नावलौकिक प्राप्त करून दिला.
माजी अटर्नी जनरल हे एक निष्कलंक प्रामाणिक व्यक्ती होते असे नायडू म्हणाले. सोराबजी आणि त्यांच्यामध्ये स्नेहपूर्ण संबंध होते असे नमूद करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, सोराबजी यांच्या मृत्यूमुळे देशाने कायदे विश्वातील तेजस्वी तारा गमावला असून त्यांच्या मृत्यूने न्यायव्यवस्थेमध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
उपराष्ट्रपतींनी सोराबजी यांच्या पत्नी व कुटुंबातील सदस्यांशी बोलून आपल्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.
***
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1715160)
आगंतुक पटल : 164