रेल्वे मंत्रालय
रेल्वेने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांसाठी कोविड रुग्णांकरिता 22 अतिरिक्त डबे केले कार्यान्वित
Posted On:
28 APR 2021 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021
कोविड विरोधात देशाच्या एकत्रित लढ्याला अधिक बळ देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आपल्या बहु आयामी उपक्रमांमधून 64,000 खाटांची सोय असलेले सुमारे 4000 विलगीकरण डबे तैनात केले आहेत.
राज्यांबरोबर समन्वित काम करण्यासाठी आणि शक्य तितक्या जलदगतीने पोहोचण्यासाठी रेल्वेने विकेंद्रित योजना आखली असून त्याद्वारे संलग्न कृतीसाठी विभागांना सामंजस्य करारावर काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेच्या जाळ्यात मागणी असलेल्या ठिकाणी हे विलगीकरण डबे सहजपणे हलवता येणार आहेत.
यानुसार, राज्यांच्या मागणीनुसार सध्या 2990 खाटांची सोय असलेले 191 डबे विविध राज्यांना कोविड रुग्णासाठी देण्यात आले आहेत. विलगीकरणाची सोय असलेले हे डबे सध्या दिल्ली, महाराष्ट्रातल्या अजनी आयसीडी आणि नंदुरबार तर मध्यप्रदेशातल्या इंदूरजवळच्या तीही इथे उपयोगात आहेत.
महाराष्ट्रात नंदुरबार इथे 58 रुग्ण सध्या या सुविधेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत 85 प्रवेशांची नोंदणी झाली आहे. 330 खाटा अद्याप उपलब्ध आहेत.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714696)
Visitor Counter : 194