उपराष्ट्रपती कार्यालय

अल्प-मुदतीच्या लाभापलीकडे ‌जाऊन पहा आणि दीर्घकालीन शाश्वत कार्य करा- उपराष्ट्रपतींचे व्यापार धुरीणांना आवाहन


उपराष्ट्रपतींच्या हस्ते भारतातील - बी स्कूल नेतृत्व परीषद-2021 चे उद्घाटन

Posted On: 27 APR 2021 7:00PM by PIB Mumbai

 

उपाध्यक्ष श्री. एम. वेंकैया नायडू यांनी आज दीर्घकालीन शाश्वत विकासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि ते म्हणाले, की जगाला अशा व्यावसायिक नेत्यांची गरज आहे जे अल्प मुदतीच्या लाभांच्या पलीकडे पाहू शकतील आणि दीर्घकालीन शाश्वत कार्य करतील.

नवी दिल्लीतील उपराष्ट्रपती निवासातून ‘इंडियन बी-स्कूल लीडरशिप कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन करताना उपराष्ट्रपतींनी असा इशारा दिला, की विकासाचे आपले प्रयत्न पर्यावरणाची किंमत देऊन असू नयेत. जागतिक तापमानवाढ आणि त्यामुळे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या सतत होत असलेल्या वाढीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, की याचा परिणाम व्यवसायांवरही होत आहे.

असोसिएशन टू एडव्हान्स कॉलेजिएट स्कूल ऑफ बिझिनेस (एएसीएसबी), यूएसए आणि एजुकेशन प्रमोशन सोसायटी फाँर इंडिया(ईपीएसआय) यांच्या संयुक्त विद्यमाने , 'इंडियन बी स्कूल्स : स्थानिक आणि जागतिक सर्वोत्तम पद्धती एकमेकांत विलीन करून शाश्वत भवितव्याच्या दिशेने आगेकूच'' या संकल्पनेवर दोन दिवसीय परीषद, दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली आहे. व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील 20 हून अधिक विचारवंत नेते, डीन, संचालक आणि धोरणकर्ते भारत आणि जगातील व्यवस्थापन शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना भेडसावणाऱ्या  विविध मुद्द्यांबद्दल यावेळी विचार मंथन करतील.

 

उपराष्ट्रपती म्हणाले, की आमच्या व्यवस्थापन शैक्षणिक संस्था(बी संस्था) आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, कारण भविष्यातील व्यवस्थापक, नेते आणि नवनवीन कल्पना साकार करणारे येथे घडविले जातात आणि प्रशिक्षित होत असतात. रोजगाराच्या मुद्द्यावर उपराष्ट्रपतींनी इंडिया स्किल्स अहवाल 2020 चा संदर्भ दिला आणि ते म्हणाले, की देशात 54 टक्के एमबीए पदवीधर रोजगारक्षम असतात. शिक्षण आणि रोजगार यातील अंतर दूर करण्याच्या पद्धतींचा विचार करण्यासाठी बी-स्कूल्सना श्री. नायडू यांनी असे आवाहन केले, की शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांनी एकमेकांतील संवाद वाढवावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील परिस्थिती आणि प्रात्यक्षिकांसह शिकण्याची संधी मिळेल.

स्वातंत्र्योत्तर काळात अमेरिकेच्या हार्वर्ड आणि एमआयटी संस्थांनी भारतीय बी-स्कूलना मदत केली, याकडे लक्ष वेधत, सध्या यूएस मधील बऱ्याच उच्च दर्जाच्या व्यवस्थापन संस्थामधील विद्याशाखांचे सदस्य जन्माने भारतीय आणि भारतात शिक्षण घेतलेले आहेत, याबद्दल श्री. नायडू यांनी आनंद व्यक्त केला.

या भाषणाचा संपूर्ण मजकूर खाली दिलेला आहे -

 

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1714409) Visitor Counter : 178