आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालय आणि आघाडीच्या योग शिक्षण संस्थानी संयुक्तरित्या केले “कोविड-19 महामारीत आरोग्य संपन्नतेसाठी योग” या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
24 APR 2021 10:24PM by PIB Mumbai
“एकात्मता आणि आरोग्य यासाठी योगा- 2019” या संयुक्तरित्या सुरू असलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयुष मंत्रालय आणि काही मुख्य योग शिक्षण संस्थांनी आभासी मंचावर “कोविड-19 महामारी स्वास्थ्य संपन्नतेसाठी योग” या एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आरोग्यासाठी योगाचे फायदे लोकांना घरबसल्या कळावेत या उद्देशाने 25 एप्रिल 2021 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महामारीमुळे लोकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता वाढताना दिसत आहे. याच वेळी लोकांच्या आरोग्यासाठी अनेक पद्धतीने, अनेक प्रकारे लाभदायी ठरणारी योगपद्धती लोकांच्या उपयोगास येईल. निरामय आरोग्य आणि तणाव मुक्ती या योगपद्धतीच्या वैशिष्ट्यांमुळे सध्याच्या वास्तवात दैनंदिन समतोल साधण्यासाठी योग्य पद्धत म्हणून योग-पद्धती कामी येईल. 25 एप्रिल 2021 या दिवशीचा एक दिवसीय कार्यक्रम हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल.
आयुष मंत्रालयाच्या फेसबुक (https://www.facebook.com/moayush/ ) आणि युट्युब (https://youtube.com/c/MinistryofAYUSHofficial ) हँडलवरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होईल. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने ठरवलेल्या योग नियमांबद्दल एक महत्वाचा भाग या कार्यक्रमात असेल. कोविड प्रतिबंधासाठी हा भाग उपयुक्त ठरेल. वर दिलेल्या हँडल्स वरून सकाळी 8 वाजता या भागाचे प्रक्षेपण होईल. इतर महत्वाच्या भागांमध्ये संध्याकाळी 5 वाजता covid-19 वर एक वेबीनार असेल. त्यात अनेक मान्यवर भाग घेऊन आपले विचार मांडतील.
***
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713869)
Visitor Counter : 157