ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतील लाभार्थ्यांना अतिरिकत् 80 लाख मेट्रिक टन धान्य प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजना-2021 मधून मिळणार
Posted On:
24 APR 2021 9:28PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरीबांबद्दलची कटीबद्धता आणि गरीब तसेच गरजूंना कोविड-19 च्या परिस्थितीत ज्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्या अनुषंगाने भारत सरकारने 2021 च्या मे व जून महिन्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी आज ही माहिती दिली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 (NFSA) संरक्षण असणाऱ्या 80 कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य पुढील दोन महिने, प्रत्येक महिन्यात दिले जाईल. पुढील दोन महिन्यांसाठी NFSA कायद्याखाली मिळणाऱ्या धान्याव्यतिरिक्त हे धान्यवितरण आधीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या धर्तीवर होईल.
भारतीय अन्न महामंडळ विशेष योजनेअंतर्गत संबधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मे 2021 व जून 2021 मध्ये नियमित NFSA अंतर्गत होणाऱ्या पुरवठ्या व्यतिरिक्त 80 लाख मेट्रिक टन अधिक धान्य पुरवठा करणार आहे, अशी माहिती पांडे यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना आणि PHH या दोन्ही योजनांतर्गत येणाऱ्या 80 कोटी लाभार्थ्यांना या विशेष योजने मधून दोन महिने प्रति महिना, प्रतिव्यक्ती पाच किलो गहू / तांदूळ ही धान्ये विनामूल्य मिळतील. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत ते पात्र असलेल्या मासिक धान्याव्यतिरिक्त हे अतिरिक्त धान्य मिळेल.
2020- 21 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना-1 ही योजना एप्रिल ते जून 2020 या महिन्यांसाठी जाहीर केली होती तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना-2 ही योजना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीसाठी जाहीर झाली होती, त्याअंतर्गत 104 लाख मेट्रिक टन गहू 201 लाख मेट्रिक टन तांदूळ असे एकूण 305 लाख मेट्रिक टन धान्य भारतीय अन्न महामंडळाकडून संबंधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले, अशी माहिती सचिवांनी यावेळी दिली.
***
S.Thakur/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713859)
Visitor Counter : 285