पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 24 एप्रिल रोजी स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डचे वितरण करणार


पंतप्रधान राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021 देखील प्रदान करणार

Posted On: 23 APR 2021 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिल 2021 रोजी (राष्ट्रीय पंचायती राज दिन ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी 12 वाजता स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डचे वितरण करणार आहेत. यावेळी 4.09 लाख मालमत्ताधारकांना ई-मालमत्ता कार्ड दिली जातील, याद्वारे देशभरात स्वामित्व योजनेची देशभरात अंमलबजावणी देखील सुरु होईल.  केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

पंतप्रधान राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021 देखील प्रदान करणार  आहेत. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021 खालील श्रेणींमध्ये देण्यात येत आहेत: दीन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार (224 पंचायती), नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार (30 ग्रामपंचायतींना), ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार (29 ग्रामपंचायतींना), बाल-स्नेही ग्रामपंचायत पुरस्कार (30 ग्रामपंचायती) आणि ई-पंचायत पुरस्कार (12 राज्ये).

पंतप्रधान, 5 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंतच्या पुरस्कारांची रक्कम एक बटण दाबून संबंधित पंचायतींना हस्तांतरित करतील.  ही रक्कम तात्काळ संबंधित पंचायतीच्या बँक खात्यात जमा केली जाईल. पहिल्यांदाच अशा प्रकारे पुरस्कार प्रदान होत आहेत.

 

स्वामित्व योजने विषयी

सामाजिक-आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी ग्रामीण भारताला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी 24 एप्रिल 2020 रोजी केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून स्वामित्व (सुधारित तंत्रज्ञानासह ग्रामीण भागातील खेड्यांचे सर्वेक्षण आणि मॅपिंग) योजनेचे उद्घाटन केले. या योजनेत मॅपिंग आणि सर्वेक्षण या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भारताचा कायापालट करण्याची क्षमता आहे. या योजनेने कर्ज आणि इतर आर्थिक लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांचा मालमत्तेला आर्थिक संपत्ती म्हणून वापरण्याचा मार्ग मोकळा केला आहे. 2021-2025 दरम्यान संपूर्ण देशातील सुमारे 6.62 लाख गावांचा या योजनेत समावेश केला जाईल.

2020-2021 या कालवधीत या योजनेचा प्रायोगिक टप्पा महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि पंजाब व राजस्थानमधील निवडक खेड्यांमध्ये राबविण्यात आला.

 

* * *

S.Patil/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1713613) Visitor Counter : 317