आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ने कोविड लसीचे आपले संपूर्ण उत्पादन केंद्र सरकारला 25 मे 2021 पर्यंत देण्याचा कुठलाही करार केलेला नाही


सरकारच्या ‘मुक्त मूल्य आणि गतिमान राष्ट्रीय कोविड-19 लस’ धोरणानुसार, राज्य सरकारांना लस उत्पादकांकडून लस खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य

Posted On: 22 APR 2021 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021

 

लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केंद्र सरकारला 25 मे 2021 पर्यंतचे आपले संपूर्ण लसीचे उत्पादन देण्याबाबत करार केला असून, त्यामुळे या तारखेपर्यंत राज्य सरकारांना सिरम कडून लस खरेदी करता येणार नाही, अशा प्रकारचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये आलेले हे वृत्त पूर्णपणे असत्य आणि निराधार आहे.

देशभरात लसीकरण मोहीम अधिक व्यापक,मुक्त आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 19 एप्रिल 2021 ला ‘मुक्त मूल्य आणि गतिमान राष्ट्रीय कोविड लसीकरण धोरण’ जाहीर केले. हे धोरण 1 मे 2021 पासून अमलात येणार आहे.

मुक्त मूल्य (किंमत) आणि गतिमान राष्ट्रीय कोविड-19  लसीकरण धोरणाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, लस उत्पादक आता आपल्या एकूण उत्पादित आणि केंद्र सरकारच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेने  (CDL)परवानगी दिलेल्या लसींपैकी 50 टक्के लस केंद्र सरकारला  देतील आणि

उर्वरित 50 टक्के लस राज्य सरकारे आणि केंद्र सरकार व्यतिरिक्त इतर कोणालाही विकण्याची मुभा सर्व लस उत्पादक कंपन्यांना देण्यात आली आहे.

त्यामुळेच, दर महिन्यात उत्पादित  आणि CDL ने मान्यता दिलेल्या  लसींच्या मात्रा लस उत्पादकांकडेच असतील. आणि त्यापैकी 50 टक्के मात्रा, केंद्र सरकर व्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून उपलब्ध असतील. 

सरकारचे हे धोरण या लिंक वर उपलब्ध आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/LiberalisedPricingandAcceleratedNationalCovid19VaccinationStrategy2042021.pdf

प्रेस रिलीज: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1712710 (19th April 2021)

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713472) Visitor Counter : 181


Read this release in: English , Tamil , Urdu , Hindi , Telugu