वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
स्टार्ट अप इंडिया सीड फंड योजनेचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला प्रारंभ
3600 स्टार्ट अप्सना या योजनेचा लाभ होण्याची अपेक्षा
Posted On:
19 APR 2021 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2021
नागरिकांना लसीच्या 10 कोटी मात्रा देत केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज स्टार्ट अप इंडिया सीड फंड योजनेचा (एसआयएसएफएस)प्रारंभ केला. संकल्पना,प्रोटोटाईप विकास, उत्पादन चाचण्या, बाजारपेठ प्रवेश आणि व्यापारीकरण यासाठी स्टार्ट अप्सना वित्तीय सहाय्य पुरवण्याचा या निधीचा उद्देश आहे. स्टार्ट अप इंडिया उपक्रमाला पाच वर्ष झाल्यानिमित्त आयोजित प्रारंभ:स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी 2021 ला या योजनेची घोषणा केली होती. पात्र स्टार्ट अप्सना सीड फंडिंगसाठी 945 कोटी रुपयांचा भांडवली निधी येत्या चार वर्षात विभागला जाईल. सुमारे 300 इनक्युबेटरद्वारे 3600 स्टार्ट अपना या योजनेद्वारे सहाय्य मिळेल अशी अपेक्षा आहे.
जाहीर केल्यापासून तीन महिन्यातच ही योजना सुरु करण्यात आल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले. काळ कठीण आहे मात्र आपला निर्धार ठाम आहे, स्टार्ट अप्सना सबल करणे सध्या अधिक महत्वाचे आहे.
एसआयएसएफएस,सीड फंडिंग सुरक्षित करेल, नवोन्मेषाला चालना देईल, परिवर्तनकारी कल्पनांना सहाय्य, सुलभ अंमलबजावणी करेल आणि स्टार्ट अप क्रांती घडवेल. ही योजना विशेषकरून भारतातल्या श्रेणी 2 आणि श्रेणी 3 मधल्या शहरामध्ये बळकट स्टार्ट अप परिसंस्था निर्माण करेल असे त्यांनी सांगितले. विशेषकरून ग्रामीण भागातल्या नवोन्मेषींनी पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आपल्या वाटते.कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी यामधला पूल म्हणून ही योजना काम करेल असे गोयल म्हणले. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी डीपीआयआयटीने तज्ञ सल्लागार समिती निर्माण केली आहे. या समितीने निवड केलेल्या पात्र इन्क्युबेटरना 5 कोटी रुपयांपर्यंत अनुदान पुरवण्यात येणार आहे. या योजनेची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे स्टार्ट अप इंडिया पोर्टल वर उपलब्ध आहेत
(www.startupindia.gov.in)
S.Patil/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712768)
Visitor Counter : 270