गृह मंत्रालय

केंद्र सरकारने ओसीआय कार्ड पुन्हा जारी करण्याची प्रक्रिया केली सुलभ

Posted On: 15 APR 2021 10:21PM by PIB Mumbai

 

प्रवासी भारतीय (ओसीआय) कार्ड पुन्हा जारी करण्याची प्रक्रिया सुकर करण्याचा निर्णय अपेक्षित असतानाच मोदी सरकारने ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

ओसीआय कार्ड भारतीय वंशाच्या परदेशी लोकांमध्ये आणि भारतीय नागरिकांच्या किंवा ओसीआय कार्डधारकांच्या परदेशी वंशाच्या जोडीदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण या कार्डमुळे सदर व्यक्तींना भारतात मुक्त प्रवेश आणि अमर्यादित दिवस राहण्याची परवानगी प्राप्त होते.  भारत सरकारने आतापर्यंत सुमारे 37.72 लाख ओसीआय कार्ड जारी केली आहेत.

विद्यमान कायद्यानुसार, भारतीय वंशाची परदेशी व्यक्ती किंवा भारतीय नागरिकाचा परदेशी जोडीदार  किंवा ओसीआय कार्ड धारकाचा परदेशी जोडीदार ओसीआय कार्डधारक म्हणून नोंदणी करू शकतो.  ओसीआय कार्ड हे भारतात प्रवेश करण्यासाठी आणि राहण्यासाठी एक आजीवन व्हिसा आहे ज्यामध्ये इतर अनेक फायदे आहेत जे इतर परदेशी लोकांना उपलब्ध नाहीत.

अर्जदाराच्या चेहऱ्यात होणाऱ्या बदलांमुळे सध्या, ओसीआय कार्ड हे 20 वर्षापर्यंत प्रत्येकवेळी नवीन पारपत्र जारी करताना आणि त्यानंतर वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जारी करणे आवश्यक आहे. ओसीआय कार्डधारकांना सुविधा देण्याच्या उद्देशाने आता भारत सरकारने यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या व्यक्तीने वयाच्या 20 व्या वर्षाच्या आधी ओसीआय कार्डधारक म्हणून नोंदणी केली आहे, त्याला 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन पारपत्र जारी केल्यावर केवळ  एकदाच ओसीआय कार्ड पुन्हा जारी करावे लागेल.  जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20 वर्षानंतर ओसीआय कार्डधारक म्हणून नोंदणी केली असेल तर त्या व्यक्तीला ओसीआय कार्ड पुन्हा जारी करण्याची आवश्यकता नाही.

ओसीआय कार्डधारकाद्वारे नवीन पारपत्रासंदर्भातील माहिती अद्ययावत करण्याच्या दृष्टीकोनातून, त्याचे/तिचे छायाचित्र असलेल्या नवीन पारपत्राची एक प्रत आणि नवीन छायाचित्र ओसीआय पोर्टलवर अपलोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, प्रत्येक वेळी वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत आणि वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन पारपत्र  जारी केले जाते. नवीन पारपत्र मिळाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत हे कागदपत्र ओसीआय कार्डधारकांद्वारे अपलोड केले जाऊ शकतात.

तथापी, भारतीय नागरिक किंवा ओसीआय कार्ड धारकाचे परदेशी वंशाचे जोडीदार जे ओसीआय कार्डधारक म्हणून नोंदणीकृत आहेत अशा व्यक्तींसाठी संबंधित व्यक्तीची माहिती देखील प्रणालीवर अपलोड असणे आवश्यक आहे, पारपत्र  धारकाचे छायाचित्र असलेल्या नवीन पारपत्राची एक प्रत आणि प्रत्येकवेळी नवीन पारपत्र दिल्यावर त्यांचे लग्न अजूनही कायम आहे अशा प्रतिज्ञापत्रासह नवीन छायाचित्र प्रणालीवर अपलोड करणे अपेक्षित आहे. हे कागदपत्र ओसीआय कार्डधारक त्याचे/ तिचे नवीन पारपत्र मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत अपलोड करू शकतात.

तपशील सिस्टमवर अपडेट केला जाईल आणि ओसीआय कार्डधारकास ई-मेलद्वारे एक  पोहोचपावती पाठविली जाईल. ओसीआय कार्डधारकास नवीन पासपोर्ट जरी करण्याच्या  तारखेपासून वेब-आधारित प्रणालीमध्ये त्याच्या / तिच्या कागदपत्रांची अंतिम पोचपावती प्राप्त होण्याच्या तारखेपर्यंत भारतात / किंवा भारता बाहेर प्रवास करण्यास कोणतेही बंधन नाही.

कागदपत्रे अपलोड करण्याच्या वरील सर्व सेवा ओसीआय कार्डधारकांना नि: शुल्क  पुरविल्या जातील.

***

S.Thakur/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712144) Visitor Counter : 359