ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
मागील वर्षाच्या याच कालावधीतील 60 लाख मेट्रिक टन गहू खरेदीच्या तुलनेत यावर्षी 64.79 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी
Posted On:
15 APR 2021 9:51PM by PIB Mumbai
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव शुधांषु पांडे यांनी आज रब्बी विपणन हंगाम 2021-22 मधील गहू खरेदीच्या संदर्भात पत्रकारांना दूरदृश्य पद्धतीने माहिती दिली.
किमान हमी भावानुसार गहू खरेदी करण्यासाठी आणि पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असे यावेळी पांडे यांनी सांगितले. आतापर्यंत 11 राज्यांतील 6,60,593 शेतकर्यांना याचा फायदा झाला आहे असे ते पुढे म्हणाले.
सध्याच्या रबी हंगामा (2021-22) दरम्यान आतापर्यंत 1,975 रुपये प्रती क्विंटल किमान हमी भावानुसार 12,800 कोटी रुपये मूल्याच्या 64.7 एलएमटी गव्हाची खरेदी केली आहे. या वर्षीच्या 427 एलएमटीच्या अंदाजित उद्दिष्टाच्या तुलनेत ही खरेदी करण्यात आली आहे. तुलनेत मागील वर्षी (2020) 389 एलएमटी इतकी विक्रमी खरेदी झाली होती परंतु त्याच तारखेला म्हणजेच 14 एप्रिल पर्यंत ही खरेदी केवळ 60 टन इतकी होती, तर रबी विपणन हंगाम 2019-20 मध्ये याच कालावधीत 12.81 एलएमटी खरेदी झाली होती अशी माहिती त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिली.
***
S.Thakur/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712140)
Visitor Counter : 203