संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलाने जाखौ, गुजरात येथे 30 किलो हेरॉईनसह पाकिस्तानी जहाज ताब्यात घेतले

प्रविष्टि तिथि: 15 APR 2021 5:50PM by PIB Mumbai

 

भारतीय तटरक्षक दलाने एटीएस गुजरातसमवेत संयुक्त कारवाई करत, पाकिस्तानी जहाज (NUH) 30 किलो हेरॉईनसह ताब्यात घेतले. जहाजावरील आठ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या गुप्त माहितीनूसार तटरक्षक दलाने एटीएस अधिकाऱ्यांसमवेत संशयित पाकिस्तानी बोट पकडण्यासाठी सापळा रचला. एप्रिल 14-15 च्या मध्यरात्री संशयित पाकिस्तानी बोट भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करत असल्याचे तटरक्षक दलाला दिसले आणि बोट ताब्यात घेतली. बोटीवरील 30 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 300 कोटी रुपये एवढी आहे. प्राथमिक चौकशीनुसार ही बोट गुजरात किनाऱ्यावर उतरणार होती, असे समजले. आठ पाकिस्तानी नागरिकांसह जहाज पुढील तपासासाठी जखौ येथे आणण्यात आले आहे.

 ***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1712053) आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi