राष्ट्रपती कार्यालय
चैत्र शुक्लादी, उगादी, गुढीपाडवा, चेतीचंद, वैशाखी, विशू, नवरेह आणि सजिबू चेरौबा या सणांच्या पूर्व संध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा
Posted On:
12 APR 2021 10:20PM by PIB Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चैत्र शुक्लादी, उगादी, गुढीपाडवा, चेतीचंद, वैशाखी, विशू, नवरेह आणि सजिबू चेरौबा या सर्व सणांच्या पूर्व संध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“या चैत्र शुक्लादी, उगादी, गुढीपाडवा, चेतीचंद, वैशाखी, विशू, नवरेह आणि सजिबू चेरौबा या सर्व सणांच्या निमित्ताने सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा.
नव वर्षाचे हे सण देशभरात विविध प्रकारे साजरे केले जातात. आपल्या विविधतेतील एकतेचे ते प्रतिक आहेत. या सणांमधून आपल्या देशाच्या संपन्न संस्कृतीचेही दर्शन घडते.
या आनंदी उत्सवांमुळे आपल्यातील संपन्नता, सुसंवाद आणि आपल्या समाजातील एकता तसेच सदिच्छा व भातृभाव वाढीला लागो”, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711255)