कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त निवृत्तीवेतन जागृतीसंबंधी “75" या शृंखलेचा केंद्रीय मंत्री डॉ . जितेंद्र सिंह यांच्याकडून प्रारंभ
Posted On:
12 APR 2021 7:32PM by PIB Mumbai
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त निवृत्तीवेतन जागृतीसंबंधित ''75" या शृंखलेचा आज प्रारंभ केला.
भारत @ 75 च्या स्मरणार्थ “अमृत महोत्सव” चा एक भाग म्हणून,निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याणकारी विभागाद्वारे“75" या शृंखलेअंतर्गत व्यापक स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त ,निवृत्तीवेतनधारक आणि जेष्ठ नागरिक यांना समर्पित असणारी ही अत्यंत अभिनव आणि सर्जनशील पद्धत असेल. समाजमाध्यमांवरील एका सर्वात नव्या माध्यमावरून जेष्ठ नागरिकांना संबोधित करणे हे 'भारताचा अमृत महोत्सवा' चे खरे सार असेल असे ते म्हणाले.
आगामी वर्षभरात विचाराधीन विविध उपक्रमांपैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या वर्षभरात समाजमाध्यमांवर, आठवड्याला दोन ट्वीटद्वारे कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी 75 महत्त्वपूर्ण नियमांची मालिका प्रसारित करणे. निवृत्तीवेतन नियमांच्या विविध पैलूंबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसह सर्व विभागातील निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी नुकत्याच करण्यात आलेल्या सुधारणांविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने, वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) च्या स्वरूपात ही ट्विट केली जाणार आहेत.
“75” संबंधी अन्य उपक्रम म्हणजे, केंद्र सरकारच्या 75 कार्यालयांच्या माध्यमातून' भविष्य' (ऑनलाईन निवृत्तीवेतन मंजुरी मोड्युल) या प्रणालीचे प्रशिक्षण देणे. या सर्व कार्यालयांना प्रथम दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रश्न-उत्तर सत्राप्रमाणे प्रशिक्षण दिले जाईल. 'भविष्य' प्रणालीचे प्रशिक्षण अनेक सत्रांच्या माध्यमातून एप्रिल 2021 पासून केंद्र सरकारच्या अनेक संस्थांमध्ये सुरू होईल. देशात विविध ठिकाणी असलेली केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) कार्यालये देखील या प्रशिक्षणात समाविष्ट केली जातील.
त्याचप्रमाणे ,''75” नियमांनुसार 75 वर्षांवरील वरिष्ठ सरकारी निवृत्तीवेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतन जागरूकता नियम जागृतीसंदर्भातील ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली जाईल. मे 2021 पासून दूरदृश्य प्रणालीद्वारे संपूर्ण देशभरात ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. यात जास्तीत जास्त शहरांचा समावेश असेल आणि कार्यशाळा देखील प्रदेशानुसार आयोजित केल्या जातील.
”75”च्या समान भावनेनुसार , अनुभव पोर्टलमधून आधीच पुरस्कार मिळालेल्या आणि निवड झालेल्यांचा समावेश असलेल्या 75 ' अनुभव " लेखांचे डिजिटल प्रकाशन , निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन कल्याण विभागामार्फत करण्यात येईल.हा उपक्रम जून 2021 पासून हाती घेण्यात येईल.
***
N.Chitale/S.Chavhan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711220)
Visitor Counter : 252