रसायन आणि खते मंत्रालय
देशात खरीप 2021 हंगामात खताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने उचललेली पावले
Posted On:
10 APR 2021 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021
कृषी व शेतकरी कल्याण विभागाने खरीप 2021 हंगामात राज्य / केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करून विविध खतांच्या आवश्यकतेचे मूल्यांकन केले असून ते खत विभागाला (डीओएफ) ला कळवले आहे. डीओएफने विविध खतांच्या उत्पादकांशी चर्चा करून स्वदेशी उत्पादन करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे आणि यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. युरियाच्या बाबतीत मूल्यांकन, खतांची आवश्यकता आणि देशी उत्पादन यामधील अंतर कमी करण्यासाठी आयातीचे नियोजन वेळेत व पुरेसे केले जात आहे. पी अँड के खतांच्या बाबतीत, आयात ओजीएल (ओपन अँड जनरल लायसन्स) च्या अंतर्गत येते, ज्यामध्ये खत कंपन्या त्यांच्या व्यावसायिक बाबींच्या आधारे प्रमाण / कच्चा माल आयात करण्यास मुक्त आहेत.
खरीप 2021 च्या हंगामाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री (सी अँड एफ) श्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी 15.3.2021 रोजी विविध खत कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक/ व्यवस्थापकीय संचालक यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. यावेळी अपेक्षित स्वदेशी उत्पादन, कच्च्या मालाची अपेक्षित आयात / तयार खतांची विस्तृत चर्चा करण्यात आली. सचिव (खते) यांच्या अध्यक्षतेखाली 01.04.2021 रोजी पाठपुरावा बैठक घेण्यात आली ज्यामध्ये विविध खत कंपन्यांनी आपली तयारी, सूचीबद्ध स्थिती व खरीप 2021 च्या मोसमासाठीची योजना सादर केली.
पी अँड के खतांच्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहितीही खत उद्योगांनी बैठकीत दिली. सर्व कंपन्यांना स्पष्टपणे सूचीत करण्यात आले की आतापर्यंत असलेल्या सोयी सुविधा तशाच सुरु राहायला हव्या. फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाने (एफएआय) यावेळी एक अहवाल सादर केला. यानुसार, राज्यांमध्ये अपेक्षित खताची आधीपासूनच यादी निश्चित केली आहे. राज्यांची विविध खतांची पुढील तीन महिन्यांची गरज भागविण्यासाठी ती पुरेशी आहे असे यात स्पष्ट केले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी खतांची उपलब्धता आणि किंमती यावर बारीक लक्ष ठेवून आहे.
S.Thakur/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710883)
Visitor Counter : 189