पर्यटन मंत्रालय
काश्मिरमधील पर्यटन विस्ताराच्या शक्यता आजमावण्यासाठी नंदनवनात आणखी एक दिवस हा पर्यटन महोत्सव पर्यटन मंत्रालय दिनांक 11ते 13 एप्रिल या कालावधीत श्रीनगर येथे आयोजित करत आहे
Posted On:
10 APR 2021 3:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021
पर्यटन मंत्रालय, काश्मिरमधील पर्यटन विस्ताराच्या शक्यता आजमावण्यासाठी नंदनवनात आणखी एक दिवस हा एक मोठा पर्यटन महोत्सव पर्यटन मंत्रालय दिनांक 11ते 13 एप्रिल या कालावधीत श्रीनगर येथे आयोजित करत आहे . जम्मू आणि काश्मीर, केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल श्री. मनोज सिन्हा आणि केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री प्रल्हादसिंग पटेल या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिनिधींना संबोधित करतील.
जम्मू काश्मीर पर्यटन विभाग, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ( फिक्की ) आणि भारतीय गोल्फ पर्यटन संस्था (आयजीटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय 11 ते 13 एप्रिल 2021 या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील असंख्य पर्यटनस्थळाना उत्पादने म्हणून प्रदर्शित करणे आणि त्यांची आरामदायक पर्यटन,साहस,पर्यावरण, विवाह,चित्रपट तसेच बैठक,प्रोत्साहन, संमेलन,प्रदर्शन अशी पर्यटनाची विविधांगी ओळख करत निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. पर्यटन मंत्रालयाचे सचिव श्री अरविंद सिंह व मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित राहतील.
या उत्सवाला भेट देणाऱ्या बाहेरच्या राज्यातील प्रतिनिधींसाठी ट्यूलिप गार्डनची तांत्रिक भेट आणि बी 2 बी सत्रासह अनेक चर्चा सत्रे, तंत्रज्ञान सहली, प्रदर्शन, संवादसत्रे अशा मनोरंजक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन केलेले असून त्यात भारताच्या इतर भागातील आघाडीचे सहल चालक त्यांच्या जम्मू काश्मिरमधील सहभागधारकांसोबत भाग घेतील आणि संवाद साधतील .
12 एप्रिल 2020 रोजी होणाऱ्या पूर्ण सत्रांमध्ये 'काश्मिरला अधिक पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून उच्च स्तरावर नेणे', 'काश्मीर पर्यटनाच्या दृष्टीने अधिक महत्वपूर्ण बनविणे', काश्मीरमधील विविध पर्यटननिगडीत उत्पादनांचे प्रदर्शन, 'वाझवान, जाफरान' आणि शिकारा ...द स्टोरी कंटिन्यूज , या चार विषयावरील चर्चासत्र , आणि मास्टर शेफ पंकज भदौरिया यांच्यासोबत चाय पे चर्चा यांचा विविध आयोजित कार्यक्रमात समावेशआहे. .
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710855)
Visitor Counter : 220