ग्रामीण विकास मंत्रालय
दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने आपल्या स्वयं सहाय्यता गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागात कोविड संदर्भात योग्य वर्तणूक आणि लसीकरण अभियान याविषयीच्या जनजागृतीला दिली चालना
प्रविष्टि तिथि:
09 APR 2021 9:03PM by PIB Mumbai
देशातील श्रेणी 2 आणि श्रेणी 3 च्या शहरांसह कोविड-19 च्या सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने कृती आवश्यक आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने 69 लाख स्वयं सहाय्यता गटांच्या आपल्या विशाल नेट वर्कसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरु केले आहे. कोविड-19 लसीकरण, कोविड-19 चा संसर्ग पसरू नये या दृष्टीने वर्तन, रोग प्रतिकार क्षमता वाढवणे या संदर्भात जन जागृतीसाठी संदेश देण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आहे. 8 एप्रिल 2021 पासून राष्ट्रीय स्तरावर याची सुरवात झाली असून स्वयं सहाय्यता गट सदस्यांच्या सर्वात शेवटच्या स्तरापर्यंत ते देण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्रालयाने जून 2020 मध्ये कोविड-19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपयायोजनाबाबत दिलेल्या प्रशिक्षणाशी संलग्न हे प्रशिक्षण आहे.
राज्य, जिल्हा आणि गट स्तरावरचे सर्व मुख्य प्रशिक्षक आणि प्रमुख कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरच्या साधन व्यक्तीकडून प्रशिक्षित केले जाईल आणि प्रशिक्षित मुख्य प्रशिक्षक क्लस्टर स्तरावर संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कृती समिती सदस्य, समुदाय साधन व्यक्ती यांना प्रशिक्षित करतील. प्रशिक्षित समुदाय साधन व्यक्ती, ग्रामीण स्तरावर सर्व स्वयं सहाय्यता गट सदस्यांना आणि अन्य समुदाय सदस्यांना प्रशिक्षित करतील. याविषयीचे मुख्य संदेश स्वयं सहाय्यता गट प्रमुखांकडून विविध माध्यमातून समुदायात पुढे प्रसारित केले जातील.
यामध्ये प्रचार पुस्तिका, उद्घोषणा,भित्ती पत्रके, रांगोळी, सामाजिक अंतराचे पालन करत छोट्या गट बैठका यांचा समावेश आहे. या दृष्टीने 8 एप्रिल 2021 ला 29 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेश यांच्या मिशन कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन ओरीएंटेशन आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण सत्रात कोविड-19 संदर्भात बचाव करण्यासाठी उपायांचा पुनरुच्चार, कोविड लसीकरणासाठीच्या सुविधांबाबत सूचनाना प्रोत्साहन यांचा समावेश आहे. दोन्ही लसीच्या साइड इफेक्ट संदर्भात जनतेच्या मनात असलेली अवाजवी भीती दूर करण्याचाही या मागचा उद्देश होता.
विविध वयोगटासाठी विशिष्ट आरोग्य जोखीम अधोरेखित करण्या बरोबरच उपलब्ध सामाजिक सुरक्षा योजनांचीही माहिती दिली जात आहे.
***
Jaydevi PS/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1710751)
आगंतुक पटल : 411