आयुष मंत्रालय
‘होमिओपॅथी - एकात्मिक औषध विज्ञानासाठी रूपरेखा ’ यावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन
Posted On:
09 APR 2021 4:43PM by PIB Mumbai
होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅन्नेमन यांच्या जयंतीदिनी जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 10 - 11 एप्रिल 2021 रोजी आयुष मंत्रालयांतर्गत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (सीसीआरएच) ‘होमिओपॅथी - एकात्मिक औषध विज्ञानासाठी रूपरेषा ’ यावर एक परिषद आयोजित करत आहे.
एकात्मिक सेवेत होमिओपॅथीच्या प्रभावी आणि कार्यक्षम समावेशासाठी धोरणात्मक कृतीसाठी धोरण निर्माते आणि तज्ञ यांच्यात अनुभवाची देवाण-घेवाण हे या परिषदेचे उद्दिष्ट असेल.
केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद उद्घाटना सत्रात, होमिओपॅथिक क्लिनिकल केस रिपॉझिटरीची सुरुवात करणार आहे . देशभरातील चिकित्सकांकडून होमिओपॅथीद्वारे बरे झालेल्या रुग्णांचा डेटाबेस संकलित करण्यात आला असून त्याचा वापर होमिओपॅथी उपचाराबाबत पुरावा आधार तयार करण्यासाठीकेला जाईल . यावेळी होमिओपॅथी संशोधन परिषडेच्या ई-लायब्ररीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. होमिओपॅथी क्लिनिकल प्रॅक्टिस आणि शिक्षणामध्ये उपयुक्त ठरतील अशी होमिओपॅथी संशोधन परिषदेची संशोधनविषयक भाषांतरित प्रकाशनेही यावेळी प्रकाशित केली जातील.
उद्घाटन सत्रानंतर भारतीय एकात्मिक औषध प्रणाली अंतर्गत होमिओपॅथीसाठी वाव आणि संधी बाबत धोरणकर्त्यांसाठी पॅनेल चर्चा होईल.
कोविड-19 उपचार आणि प्रतिबंध यासाठी होमिओपॅथीचा वापर याविषयी एक विशेष सत्र होईल ज्यात कोविड या विषयाचे संशोधक आणि प्रमुख शिक्षणतज्ज्ञ कोविड 19 उपचार आणि प्रतिबंध यात होमिओपॅथीची भूमिका विशद करतील.
डॉ. मायकेल फ्रॅस, प्रोफेसर मेडिसिन, इंटर्नल मेडिसिन आणि इंटर्नल इंटेंसीव्ह केअर मेडिसिन, व्हिएन्ना आणि डॉ. टू का लून आरोन, अध्यक्ष, एचके असोसिएशन ऑफ होमिओपॅथी, हाँगकाँग या अधिवेशनात दुरदृष्य पद्धतीने सहभागी होणार असून एकात्मिक क्लिनिकल केअर बाबत त्यांचे अनुभव सांगतील.
‘मिथ बस्टिंग इन होमिओपॅथी’ या व्हिडिओ बनवण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमादरम्यान पारितोषिके दिली जातील.
दोन दिवसीय अधिवेशनातील चर्चा सार्वजनिक आरोग्य तसेच संशोधनात होमिओपॅथी एकीकरणासाठी भविष्यातील रूपरेषा आखण्यासाठी सहाय्यभूत ठरेल..
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710716)
Visitor Counter : 230