निती आयोग

नीती आयोग येत्या शनिवारी ऑनलाईन तंटा निवारण पुस्तिकेचा  करणार शुभारंभ

Posted On: 09 APR 2021 6:35PM by PIB Mumbai

 

नीति आयोग येत्या शनिवारी ऑनलाईन तंटा निवारण पुस्तिकेचा शुभारंभ  करणार  असून यासाठी अगामी आणि  ओमिद्यार नेटवर्क इंडिया, आयसीआयसीआय  बँक,अशोका इनोव्हेटर्स फॉर द पब्लिक, ट्रायलीगल, डालबर्ग, द्वारा आणि एनआयपीएफपी यांचा  सहयोग लाभला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी वाय चंद्रचूड़ या पुस्तिकेचा शुभारंभ करणार असून ते यावेळी संबोधितही करणार आहेत. नीति आयोगाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, टाटा सन्सच्या उपाध्यक्ष  पौर्णिमा संपत आणि उड़ानचे  सुमित गुप्ता  यावेळी उपस्थित राहणार  आहेत.

ही पुस्तिका म्हणजे भारतात ओडीआर अर्थात ऑनलाईन तंटा निवारणाचा अंगीकार करण्यासाठी व्यावसायिक जगताला एक प्रकारे निमंत्रण आहे.ही पुस्तिका अशा प्रकारच्या यंत्रणेची आवश्यकता अधोरेखित करते.  देशात व्यावसायिक जगत या ओडीआर मॉडेलचा स्वीकार करू शकते  आणि त्यांना आवश्यक पावले उचलण्यासाठी योग्य मार्ग यातून मिळू शकतो.

ओडीआर ही तंटा निवारणाची न्यायालया बाहेरची, विशेषतः लघु आणि मध्यम प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी व्यवस्था असून यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि पर्यायी तंटा निवारण तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. वाटाघाटी, मध्यस्थी आणि लवाद यांचा यात समावेश आहे. न्यायालये डीजीटाईज करण्यात येत आहेत अशा परिस्थितीत प्रभावी, व्यापक आणि  तंटा निवारणासाठी सहयोगपूर्ण यंत्रणेची तातडीची आवश्यकता असून ओडीआर प्रभावी आणि किफायतशीर म्हणून उपयुक्त ठरू शकते.

***

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1710715) Visitor Counter : 17