मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग आणि आयुष मंत्रालय यांच्यात पशुवैद्यकीय शास्त्रात आयुर्वेद आणि त्याच्या संलग्न शाखांची संकल्पना आणण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
Posted On:
08 APR 2021 3:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2021
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग (डीएएचडी), मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय, केंद्र सरकार आणि आयुष मंत्रालय, केंद्र सरकार यांच्यात पशुवैद्यकीय शास्त्रात आयुर्वेद आणि त्याच्या संलग्न शाखांची संकल्पना आणण्यासाठी 7 एप्रिल 2021 रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या अंतर्गत औषधी वनस्पतींद्वारे पशुवैद्यकीय विज्ञानासाठी दर्जेदार औषधांच्या नवीन फॉरम्युलेशन्ससह संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या सहकार्यामुळे पशु आरोग्य, पशुधन मालक समुदाय आणि समाजाच्या हितासाठी पशुवैद्यकीय क्षेत्रात आयुर्वेदाच्या वापरासाठी नियामक यंत्रणा विकसित होण्यास निश्चितच मदत होईल. या उपक्रमात प्रशिक्षणाच्या माध्यमातून संबंधित क्षेत्रात क्षमता वाढवणे, शाश्वत आधारावर हर्बल पशुवैद्यकीय औषधांच्या विपणनाच्या शक्यतांचा शोध घेणे आणि औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन यासारख्या सेवा प्रदान करणे यांचा समावेश आहे. या सहकार्याने हर्बल पशुवैद्यकीय शैक्षणिक कार्यक्रम विकसित करण्यास तसेच दुग्धउत्पादक शेतकरी आणि कृषी-शेतकरी यांच्यात हर्बल पशुवैद्यकीय औषधाचे महत्त्व आणि वापर तसेच औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबत जागरूकता वाढविण्यात मदत होईल.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710405)
Visitor Counter : 272