रेल्वे मंत्रालय

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतीय रेल्वेने आतापर्यंतची सर्वाधिक भंगार विक्री केली


भंगार विक्रितून भारतीय रेल्वेने 2020-21 या आर्थिक वर्षात केली 4573 कोटी रुपयांची कमाई

गतवर्षीच्या 4333 कोटी रुपयांच्या विक्रीच्या तुलनेत आताची विक्री 5.5 % नी जास्त

सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करत भंगार माल जागेवरून हलवून ई-लिलावाच्या माध्यमातून विक्री करण्यावर रेल्वेने मेहनत घेतली

Posted On: 07 APR 2021 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2021

 

भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केलेली  भंगार विक्री आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.  या विक्रीतून भारतीय रेल्वेला 2020-21 या आर्थिक वर्षात झालेली 4573 कोटी रुपयांची कमाई  2019-20 मधील म्हणजे गेल्यावर्षीच्या 4333 कोटी रुपयांच्या तुलनेत 5.5% नी जास्त आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 2009-10 मधे झालेल्या 4409 कोटी रुपयांच्या विक्रीच्या तुलनेतही ही विक्रि जास्त आहे. सर्व उपलब्ध संसाधने वापरून भंगार माल जागेवरून उचलून ई-लिलावाच्या माध्यमातून त्याची विक्री करणे यावर रेल्वेने मेहनत घेतली.

सेवा न देणारा/ जुना झालेला माल वेगळा करून त्याची विक्री करणे ही रेल्वे विभागात  सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे आणि  विभागीय रेल्वे  तसेच रेल्वे मंडळाकडून तिची उच्चस्तरीय देखरेख होते. भंगार माल त्या त्या ठिकाणहून आणून त्याची ई-लिलावाद्वारे विक्री करणे यावर रेल्वे व्यवस्थापन सर्व मेहनत घेते. सर्वसाधारणतः उभारणीच्या प्रकल्पातील गेज बदलण्याच्या कामात जास्तीत जास्त भंगार निर्माण होतो. यातील काही कायमस्वरूपी घटक हे रुळांवर पुन्हा वापरण्याजोगे नसतात. रेल्वेच्या लिखीत तरतुदींनुसार असा माल निकालात काढला जातो.

 

 Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1710214) Visitor Counter : 194