शिक्षण मंत्रालय
ई 9 देशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या सल्लामसलत बैठकीत शिक्षण राज्य मंत्र्यांचे संबोधन
Posted On:
07 APR 2021 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2021
एसडीजी 4 अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट 4 गाठण्याच्या दृष्टीने वेगवान प्रगती करण्यासाठी डिजिटल शिक्षणाचे प्रमाण वाढवणे : या ई 9 देशांच्या उपक्रमाअंतर्गत 6 एप्रिल 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ई 9 देशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या सल्लामसलत बैठकीला शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संबोधित केले. बांगलादेशच्या शिक्षण मंत्री श्रीमती दिपू मोनी, संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव श्रीमती अमीना मोहम्मद , ई 9 देशांचे शिक्षण मंत्री आणि संयुक्त राष्ट्र, युनिसेफ आणि यूनेस्कोचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. ई 9 देशांमध्ये बांगलादेश, ब्राझील, चीन, इजिप्त, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, नायजेरिया आणि पाकिस्तानचा समावेश आहे.
यावेळी बोलताना धोत्रे यांनी सांगितले की, कोविड 19 महामारीने जगभरात शिक्षणात अडथळा आणला आहे. भारतात इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे खरोखर आव्हान होते. डिजिटल , दूरचित्रवाणी आणि रेडिओ यांसारख्या विविध माध्यमांचा वापर करून, सर्वांनाच गुणवत्तापूर्ण शिक्षणच दिले नाही तर आमच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही हे सुद्धा भारत सरकारने सुनिश्चित केले , असे श्री धोत्रे यांनी याबाबत आनंद व्यक्त करीत सांगितले. या महामारीदरम्यान, शिक्षण मंत्रालयाने सुमारे 2.3 दशलक्ष विद्यार्थ्यांसाठी मुख्य अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा यशस्वीरित्या घेऊन सुरक्षित परीक्षा घेतल्याचे उदाहरण अन्य देशांसमोर ठेवले, असे त्यांनी सांगितले.
धोत्रे म्हणाले की,सर्वांसाठी परवडणारे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल आणि मल्टिमॉडेल शिक्षण आवश्यक आहे, हे या महामारीने दाखवून दिले आहे. यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा बळकट करणे, साधने आणि डिजिटल कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710123)
Visitor Counter : 262