माहिती आणि प्रसारण मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        ‘दवाई भी, कडाई  भी’ अर्थात ‘औषधही आणि अनुशासनही’ हा संदेश प्रसारित करा, अशी  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सर्व खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                06 APR 2021 7:44PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
देशातील वाढत्या कोविड -19 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज सर्व खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. देशात सध्या उद्भवलेल्या  परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 4  एप्रिल, 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याचे यात नमूद केले आहे.  चाचणी, शोध , उपचार, कोविड योग्य वर्तन आणि लसीकरण या पंचसूत्रीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मंत्रालयाने जनहिताचा संदेश प्रसारित करण्यात  खासगी टीव्ही वाहिन्यांनी आतापर्यंत बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. कोविड -योग्य वर्तन आणि  पात्र व्यक्तींसाठी  लसीकरणाचा संदेश प्रसारित करून  ‘दवाई भी कडाई भी’ अर्थात ‘औषधही आणि अनुशासनही’ या संदेशाबाबत  अधिकाधिक जनजागृती करण्याचे आवाहन मंत्रालयाने  केले आहे.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1709916)
                Visitor Counter : 301