आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एकूण लसीकरण 8 कोटी पेक्षा अधिक


एकूण कोविड 19 चाचण्यांची संख्या 25 कोटींच्या पुढे

Posted On: 06 APR 2021 11:48AM by PIB Mumbai

कोविड 19 विरूद्ध भारताच्या लढाईतील महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवत गेल्या 24 तासांत  43 लाखाहून अधिक लसींचे डोस दिले गेले. हे  देशातील आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वोच्च  लसीकरण  आहे.

लसीकरण मोहिमेच्या (5 एप्रिल , 2021) च्या 80 व्या दिवसापर्यंत लसींचे  43,00,966  डोस देण्यात आले. त्यापैकी 39,00,505 लाभार्थ्यांना  48,095 सत्रांमध्ये प्रथम डोससाठी लसीकरण करण्यात आले आणि 4,00,461 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस प्राप्त झाला.

आणखी एक उल्लेखनीय कामगिरी नोंदवताना , देशभरात राबविल्या जात असलेल्या कोविड 19 लसीच्या डोसची एकूण संख्या आज 8.31  कोटीच्या पुढे गेली आहे. पहिल्या डोसच्या  लसीकरणानेही  7 कोटी (7,22,77,309) चा टप्पा ओलांडला आहे

भारतात दररोज नवीन रुग्णांची संख्या  वाढतच आहे. गेल्या 24 तासांत  96,982 नवीन रुग्ण आढळले.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात या आठ राज्यांत कोविडच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 80.04% या 8 राज्यांमधील  आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात सर्वाधिक 47,288 रुग्ण आढळले.

भारताची  एकूण सक्रिय रुग्णसंख्या 7,88,223 वर पोहोचली आहे. त्यात आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 6.21 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येतून  46,393 रुग्णांची वाढ झाली आहे.

देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी  जवळपास 57.42% एकट्या महाराष्ट्रात आहेत .

देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज  1,17,32,279 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 92.48% आहे.

गेल्या 24 तासात 50,143 रुग्ण बरे झाले

गेल्या 24 तासांत 446 मृत्यूची  नोंद झाली.

नवीन मृत्यूंमध्ये 80.94 टक्के मृत्यू आठ राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 155 मृत्यूंची नोंद झाली आहे.

***

MC/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1709829) Visitor Counter : 607