शिक्षण मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी 7 एप्रिल 2021 रोजी संवाद साधणार

Posted On: 05 APR 2021 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2021 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणाऱ्या विशेष कार्यक्रमाची चौथी आवृत्ती कोविड-19 नियमावलीच्या अनुषंगाने प्रथमच दूरसंवाद पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुधवारी 7 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता दूरदर्शन वाहिन्या तसेच डिजिटल माध्यमातून हिंदी व इतर प्रादेशिक भाषांमधून होईल. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे सलग चौथ्या वर्षी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे.

नववी ते बारावीतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी 17 फेब्रुवारी ते 14 मार्च 2021 या कालावधीत https://innovateindia.mygov.in/ppc-2021/ या संकेतस्थळावर विविध विषयांवरील ऑनलाईन सृजनशील लेखन स्पर्धा घेतली होती.

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या चौथ्या भागासाठी जवळपास 14 लाख जणांनी  नावनोंदणी केली आहे.  सृजनशील लेखन स्पर्धेत 10.5 लाख विद्यार्थी, 2.6 लाख शिक्षक व 92 हजार पालकांनी उत्साहाने भाग घेतला. भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी 60% हून जास्त विद्यार्थी नववी व दहावीचे आहेत. ‘परिक्षा पे चर्चा’ पूर्व सृजनशील लेखन स्पर्धेत प्रथमच 81 इतर देशातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

परिक्षा पे चर्चा हा मुख्य कार्यक्रम दूरदर्शन वाहिन्या तसेच  EduMinofIndia, narendramodi, pmoindia, pibindia, DoordarshanNational, MyGovIndia, DDNews, RajyaSabhaTV, SwayamPrabha ही डिजिटल माध्यमे त्यांच्या फेसबुक आणि युट्युब वाहिन्यांवर 7  एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रसारित करतील. #ExamWarriors #PPC202 हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर  समाजमाध्यमांमध्ये वापरले जात आहेत. 

परिक्षेचा उत्सव करणाऱ्या  ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी देश एकत्र येईल ज्यामुळे देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना पंतप्रधानांच्या उभारी देणाऱ्या शब्दांचा लाभ घेता येईल.


* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709718) Visitor Counter : 178