निती आयोग

अटल इनोव्हेशन मिशनच्या नव्या मिशन संचालकांच्या नियुक्तीविषयीची अधिसूचना

Posted On: 05 APR 2021 9:38AM by PIB Mumbai

अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम )चे नवे मिशन संचालक म्हणून प्रख्यात सामाजिक- तंत्रक्षेत्र तज्ञ डॉ चिंतन वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशन  या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. 2017 पासून एआयएमचे पहिले मिशन  संचालक म्हणून काम पाहणाऱ्या रामनाथन रामानन यांच्याकडून डॉ वैष्णव सूत्रे स्वीकारत आहेत. डॉ वैष्णव  अमेरिकेतल्या मॅस्च्युएटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून अटल इनोव्हेशन मिशन ची  ची सूत्रे स्वीकारत आहेत.

अटल इनोव्हेशन मिशन साठी भक्कम पाया घालण्याकरिता दिलेल्या मौल्यवान योगदानासाठी नीती आयोगाने रामानन यांचे आभार मानले आहेत. चार वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत, एआयएमचे मिशन पुढे नेण्यासाठी त्यांनी प्रतिभावान युवा व्यावसायिकांची बळकट फळी निर्माण केली.

एआयएमचे नवे मिशन संचालक म्हणून या एप्रिलच्या मध्यात कार्यभार स्वीकारणाऱ्या डॉ वैष्णव यांचे नीती आयोगाने स्वागत केले आहे. अभियंता असणारे डॉ वैष्णव हे मानवी आणि तंत्र विषयक जटील विशाल प्रणाली उभारणे यामध्ये प्रशिक्षित आहेत.

शिक्षक, नवोन्मेशक, उद्योजक म्हणून वैष्णव यांना भारत आणि अमेरिकेत, नवोन्मेश परिसंस्थेच्या विविध भागांमध्ये काम करण्याचा  अनुभव आहे. गेल्या दशकात त्यांनी एमआयटी मध्ये शिक्षण आणि संशोधन अशा दोन्ही क्षेत्रात  काळ व्यतीत केला असून मानवाच्या  परिस्थितीत सुधारणा करताना येणारे  मुलभूत  अडथळे दूर करण्यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी भारतातल्या ग्रामीण समुदायासमवेत राहून कार्य केले आहे. अनेक व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांचे ते सह संस्थापक आहेत. एमआयटी मधून त्यांनी तंत्रज्ञान,व्यवस्थापन आणि धोरण या विषयातली पीएचडी प्राप्त केली आहे.  

देशभरात नवोन्मेश आणि उद्योजकता यासाठी जोमदार परिसंस्था निर्माण करून प्रोत्साहन देणे हे अटल इनोव्हेशन मिशनचे उद्दिष्ट आहे. अटल इनोव्हेशन मिशनने आतापर्यंत  650 जिल्ह्यातल्या शाळांमध्ये  7,259 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारल्या आहेत. यातून 3.5 दशलक्ष विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा लाभ घेणे शक्य होणार आहे. अटल इनोव्हेशन मिशनने 68 अटल इन्क्युबेटर कार्यान्वित केले असून 2,000 स्टार्टअप ना चालना दिली असून त्यापैकी 625 स्टार्टअप्स महिलांचे आहेत.  ग्रामीण भारतातल्या गरजांची दखल घेणाऱ्या समाज केन्द्री नवोन्मेशाला चालना देण्यासाठी 20 अटल कम्युनिटी इनोव्हेशन केंद्र उभारणीला  अटल इनोव्हेशन मिशन  ने चालना दिली आहे.

***

JPS/NC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709606) Visitor Counter : 308