आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरण- 78 वा दिवस
कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 7.44 कोटींपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या
रात्री 8 वाजेपर्यंत लसींच्या 13 लाख मात्रा देण्यात आल्या
प्रविष्टि तिथि:
03 APR 2021 10:03PM by PIB Mumbai
देशात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रांची संख्या 7 कोटी 44 लाखांच्या पुढे गेली आहे.
आज रात्री 8 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार लसीच्या एकूण 7,44,42,267 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 89,53,552 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या 53,06,671 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 96,19,289 कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 40,18,526 कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 45 वर्षांवरील 4,57,78,875 लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या 45 वर्षांवरील 7,65,354 लाभार्थ्यांचा समावेश आहे.
आज देशव्यापी लसीकरणाचा 78 वा दिवस होता आणि आज रात्री 8 वाजेपर्यंत 13,00,146 मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालातील माहितीनुसार यापैकी 11,86,621 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर 1,13,525 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल आज रात्री उशिरा पूर्ण होईल.
****
S.Thakur/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1709398)
आगंतुक पटल : 176