उपराष्ट्रपती कार्यालय

ईस्टरच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींचा संदेश

Posted On: 03 APR 2021 9:37PM by PIB Mumbai

 

ईस्टरच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रभू येशु ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस असलेल्या या शुभ प्रसंगी मी आपल्या देशवासीयांना शुभेच्छा देत आहे. मानवजमातीचा उद्धारकर्ता म्हणून वंदनीय असलेल्या येशु ख्रिस्ताने प्रेम, शांती, करुणा आणि क्षमा यांच्या माध्यमातून मानवतेच्या मुक्तीचा मार्ग उजळून टाकला. संपूर्ण मानवजमातीविषयी करुणा बाळगून आपण ईस्टर साजरा करुया. हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, शांतता आणि एकात्मता घेऊन येवो, असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

****

S.Thakur/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709397)