रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2020-21 या आर्थिक वर्षात प्रतिदिन 37 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचा विक्रमी टप्पा गाठला

Posted On: 02 APR 2021 9:13AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 2एप्रिल 2021

 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत देशातील राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामात प्रचंड प्रमाणात प्रगती करून दाखविली आहे. मंत्रालयाने 2020-21 या आर्थिक वर्षात प्रतिदिन 37 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचा विक्रमी टप्पा गाठण्यात अभूतपूर्व यश मिळविले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संध्याकाळी झालेल्या समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि त्यांना कृतज्ञता पत्रे प्रदान केली. सर्व अधिकारी आणि इतर संबंधितांनी समर्पित वृत्तीने आणि संघ भावनेने काम केले नसते तर  मंत्रालयाला हा टप्पा गाठणे शक्यच झाले नसते अशा शब्दात गडकरी यांनी सर्व संबंधितांचे कौतुक केले आहे. हे यश अभूतपूर्व असून जगातील कोणत्याही देशाने अशा प्रकारची कामगिरी केलेली नाही असे ते म्हणाले.

मंत्रालयाने गाठलेल्या काही प्रमुख टप्प्यांची माहिती खाली दिली आहे. 

·        गेल्या 7 वर्षांत  राष्ट्रीय महामार्गांची लांबी 50% नी वाढली असून एप्रिल 2014 मध्ये देशात 91,287 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते तर 20मार्च 2021 ला 1,37,625 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले आहेत

·        या कामासाठी 2015 च्या अर्थसंकल्पात 33,414 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्यात वाढ करून 2022 च्या अर्थसंकल्पात एकूण 1,83,101 कोटी रुपयांचा निधी  रस्तेनिर्मितीसाठी देण्यात आला आहे.

·        कोविड -19 शी संबंधित समस्या असताना देखील 2020 या आर्थिक वर्षापेक्षा 2021 या आर्थिक वर्षात रस्ते – महामार्ग निर्मितीसाठी 126% जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे तसेच रस्ते निर्मितीसाठी मंजूर झालेल्या किलोमीटरचे प्रमाण देखील गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 9% इतके जास्त आहे.

·        आर्थिक वर्ष 2010 ते 14 या कालावधीपेक्षा आर्थिक वर्ष 2015 ते 21 या कालावधीत  सरासरी वार्षिक रस्ते-महामार्ग प्रकल्प मंजुरीत 85% वाढ करण्यात आली आहे.

·        आर्थिक वर्ष 2010 ते 14 या कालावधीपेक्षा आर्थिक वर्ष 2015 ते 21 या कालावधीत रस्त्यांच्या  सरासरी वार्षिक बांधकामासाठी मंजूर लांबीत 83% नी वाढ करण्यात आली आहे.

·        सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांच्या कामांच्या एकूण खर्चात  31 मार्च 2020 ला संपलेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत   आर्थिक वर्ष 2021च्या अखेरीस 54% इतकी वाढ करण्यात आली आहे.

***

JPS/SC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709177) Visitor Counter : 1075