नौवहन मंत्रालय
सुरत आणि दीव दरम्यानच्या क्रूझ सेवेला केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दाखवला हिरवा झेंडा
जल वाहतूक हे वाहतुकीसाठीचे नवे भविष्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे- मांडवीय
Posted On:
31 MAR 2021 9:19PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी आज सुरतमधले हाझीरा बंदर ते दीव दरम्यानच्या क्रूझ सेवेला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली क्रूझ पर्यटन विकासावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे मनसुख मांडवीय यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले.
2014 पासुन क्रूझ द्वारे पर्यटन करणाऱ्या प्रवासी संख्येत वाढ होत असून 2014 पूर्वी ही संख्या एक लाख होती तर 2019-20 मध्ये ही प्रवासी संख्या 4.5 लाख झाल्याचे ते म्हणाले.
भारतीय किनारपट्टीला क्रूझ पर्यटनासाठी प्रचंड क्षमता असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. पश्चिम किनारपट्टीवर मुंबई, गोवा आणि कोच्ची तर पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणम, कोलकाता आणि चेन्नई अशा 6 आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे नियोजन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.जल वाहतूक हे वाहतुकीचे नवे भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या जहाजाची 300 प्रवाश्यांची क्षमता असून त्याला 16 केबिन आहेत. हे जहाज आठवड्यातून दोन फेऱ्या करणार असून एका प्रवासासाठी प्रती माणशी, 900 रुपये अधिक कर असे प्रवासभाडे राहणार आहे. डेकवर करमणुकीसह इतर आधुनिक सुविधाही उपलब्ध असतील.
नोव्हेंबर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाझीरा – घोगा रोपॅक्स सेवेचे उद्घाटन केले आणि चार महिन्यातच एक लाख प्रवासी आणि हजारो वाहनांनी, प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी या फेरी सेवेचा लाभ घेतला. या सेवेच्या यशामुळे गुजरातसह संपूर्ण भारतात जल वाहतुकीच्या अनेक मार्गांसाठी दारे खुली झाल्याचे मांडवीय म्हणाले.
****
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708808)
Visitor Counter : 301