संरक्षण मंत्रालय
बीईएलने आथिर्क वर्ष 2020-21 साठीचा दुसऱ्या अंतरिम लाभांशांचा 174.43 कोटी रुपयांचा धनादेश संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह यांना केला सुपूर्द
Posted On:
30 MAR 2021 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2021
नवरत्न श्रेणीतली संरक्षण क्षेत्रात कार्यरत (सार्वजनिक क्षेत्रातली) कंपनी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ने सरकारला त्यांच्या भांडवलावर 140% इतका दुसरा अंतरिम लाभांश दिला आहे.
हा लाभांश आर्थिक वर्ष 2020 - 21 या आर्थिक वर्षासाठीचा आहे.
बीईएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. एम.व्ही. गौतम यांनी एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश धनादेश सुपूर्द केला. भारताच्या राष्ट्रपतींच्या अखत्यारीतल्या समभागावर 31 मार्च 2021 रोजी वठला जाणारा हा धनादेश, संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सचिव (संरक्षण उत्पादन) श्री राज कुमार देखील यावेळी उपस्थित होते.
बीईएलने सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आपल्या भागधारकांना दुसरा अंतरिम लाभांश (रु. 1.40 / - प्रती समभाग) 140% टक्के जाहीर केला आहे. बीईएल सलग 18 वर्ष अंतरिम लाभांश देत आहे.बीईएलने 2019-2 या आर्थिक वर्षात पेड-अप भांडवलावर एकूण 280% लाभांश दिला आहे.
* * *
M.Chopade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708552)
Visitor Counter : 240