आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ हर्ष वर्धन आणि श्रीमती नूतन गोयल यांनी घेतली कोविड-19 लसीची दुसरी मात्रा
“पहिली मात्रा घेतल्यापासून अद्याप काहीही त्रास झाला नाही”
जोपर्यंत सगळे लोक सुरक्षित नाहीत, तोपर्यंत आपण कोणीही सुरक्षित नाही: डॉ हर्ष वर्धन यांचे सर्वांना कोविडविषयक नियम पाळण्याचे आणि पात्र नागरिकांना लस घेण्याचे आवाहन
Posted On:
30 MAR 2021 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी त्यांच्या पत्नी नूतन गोयल यांनी आज नवी दिल्लीतील दिल्ली हार्ट अँड लंग इन्स्टिट्यूट येथे ‘कोव्हॅक्सीन’ या कोविड-19 लसीची दुसरी मात्रा घेतली. त्यांनी लसीची पाहिली मात्रा 2 मार्च 2021 रोजी घेतली होती.
प्रत्येक पात्र व्यक्तीने, विशेषतः सरकारने, 45 वयापेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांसाठी लसीकरण करण्याची अनुमती दिल्याच्या पार्श्वभूमीवर, ही पात्रता असलेल्या प्रत्येकाने, लवकरात लवकर लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. “आमची पहिली मात्रा घेतल्यापासून आम्हाला अद्याप कोणताही त्रास झाला नाही” असेही त्यांनी संगितले. त्याचवेळी लसीमुळे होणारे दुष्परिणाम – AEFI विषयीची देखरेख आणि इतर सुविधांचा समावेश लसीकरण पद्धती आणि नियमांमध्येचा करण्यात आला आहे, असे सांगत, एकूण लाभार्थ्यांमध्ये लसीचे दुष्परिणाम जाणवलेल्या लाभार्थ्यांची संख्या कमी प्रमाणात आहे, असेही ते म्हणाले. “सर्व लसी संपूर्णपणे सुरक्षित, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आणि प्रभावी आहेत.” असे ते म्हणाले. काही वार्ताहरांनी यावेळी, लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले असता, त्यावर स्पष्टीकरण देतांना डॉ हर्ष वर्धन म्हणाले की, “अगदी मोजक्या लोकांच्या बाबतीत असे झाले आहे. लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर शरीरात प्रतिजैविके विकसित होण्यास दोन आठवड्यांचा वेळ लागतो. या काळात संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या संपूर्ण काळात( लस घेतल्यानंतरही) कोविड विषयक नियमांचे काटेकोर पालन करायचे आहेच”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्यांनी लस घेतली आहे, त्यांना कोविडचा संसर्ग झाला तरीही तो सौम्य स्वरूपाचा असेल आणि त्याचे गंभीर परिणाम जाणवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोविड रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीबाबत केंद्र सरकार सतर्क आहे, असेही डॉ हर्ष वर्धन म्हणाले. “लोकांकडून कोविड विषयक नियमांचे पालन करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे आणि निष्काळजीपणामुळे संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढतो आहे.” असे त्यांनी नमूद केले. नियमांचे पालन आणि लसीकरणात सहभाग हे दोन कोविड विरुद्धच्या जन आंदोलनाचे महत्वाचे स्तंभ आहेत, असे डॉ हर्ष वर्धन यावेळी म्हणाले.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708493)
Visitor Counter : 291