रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

रस्ते बांधणीवर भर दिल्यामुळे रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्थेची शाश्वत वाढ सुनिश्चित होईल : गडकरी

Posted On: 25 MAR 2021 6:51PM by PIB Mumbai

 

सरकारकडून रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवर भर दिला जात असल्यामुळे मागणी वाढेल, शाश्वत आणि समावेशक वाढीसाठी  एक मजबूत पाया प्रदान करेल आणि देशातील कोट्यवधी लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास  रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री  नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला .

रस्ते पायाभूत विकास  - मागणीत वाढ  : विकासाला प्रोत्साहन यावरील भारतीय उद्योग महासंघाच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना गडकरी यांनी देशाच्या आर्थिक वाढीमध्ये रस्ते पायाभूत सुविधानी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला.

नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन या जागतिक दर्जाच्या  पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाबाबत बोलताना ते  म्हणाले की, याचा विस्तार आणखी 7,300 प्रकल्पांसाठी करण्यात आला असून त्यासाठी 2025 पर्यंत 111 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. ते म्हणाले की 44 लाख कोटी रुपये म्हणजेच 40 % प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु असून 34 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प, म्हणजेच 30 टक्के प्रकल्प संकल्पनांच्या टप्प्यावर आहेत आणि 22 लाख कोटी रुपयांचे  म्हणजेच 20 टक्के प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

यावर्षी सरकारने पायाभूत भांडवली खर्च 34 % ने वाढवून 5.54 लाख कोटी रुपये केल्याची माहिती त्यांनी दिली.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या व्यवसाय स्नेही  उपक्रमांबद्दल बोलताना  गडकरी म्हणाले की महामार्ग बांधकामात अधिक उद्योजकांना सहभागी होता यावे यासाठी नवीन निविदासाठी  बोली लावण्यासाठी ईएमडीची (इसाऱ्याची रक्कम ) आवश्यकता काढून टाकली आहे

सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांबाबत ते  म्हणाले की एनएचएआयच्या माध्यमातून मंत्रालय पुढील पाच वर्षात टोल ऑपरेट ट्रान्सपोर्ट मोड अंतर्गत एक लाख कोटी रुपये उभारण्याच्या विचारात आहे.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1707597) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi