रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेने धूम्रपान आणि ज्वलनशील सामग्रीच्या वाहतूकी विरोधात सुरू केली व्यापक मोहीम

Posted On: 23 MAR 2021 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2021

 

रेल्वेच्या विविध परिक्षेत्रात/रेल्वेमार्गांवर आग लागल्याने मालमत्तेचे झालेले नुकसान आणि जीवितीला धोका निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी काही घटना रेल्वेगाडीत धूम्रपान करणे किंवा ज्वलनशील सामग्रीच्या वाहतुकीमुळे झाल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेने धूम्रपान आणि ज्वलनशील सामग्रीच्या वाहतुकीविरूद्ध व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला 22.03.2021 रोजी प्रारंभ झाला असून 31.03.2021 पासून कायदेशीर कारवाईसह ही धडक मोहीम राबवली जाणार आहे. ती 30.04.2021 पर्यंत सुरू राहू शकेल.

भारतीय रेल्वेने सर्व परिक्षेत्रांना युद्धपातळीवर पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत:

  1. जागरूकता अभियान राबवणे -

आग लागू नये यासाठी सावधगिरी बाळगावी यादृष्टीने सात दिवसांची व्यापक जागरुकता मोहिम राबवली जाईल. या अंतर्गत धूम्रपान न करणेरेल्वेमार्गे ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीला प्रतिबंध याबाबत थेट संवाद, पत्रके वाटप, स्टिकर चिकटवणे, पथनाट्य, मुद्रीत माध्यमांमध्ये जाहिरात, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमातून जनजागृती इत्यादींचा समावेश आहे.

  1. व्यापक जागरूकता मोहीम, एक फलदायी आणि शाश्वत मोहीम राबवणे –
  1. रेल्वे गाडीत आणि रेल्वेच्या परिसरात धूम्रपान करण्याविरोधात कठोर मोहीम राबवली जाईल आणि उल्लंघन करणाऱ्यांवर रेल्वे अधिनियम किंवा तंबाखू कायद्याच्या संबंधित तरतुदींखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
  2. ज्वलनशील आणि स्फोटक वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी नियमित तपासणी केली जाईल.

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706979) Visitor Counter : 143